\Manjiri Marathes pre-arrest bail application rejected by court
\Manjiri Marathes pre-arrest bail application rejected by court 
पुणे

मंजिरी मराठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मराठे ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या रोख रक्कम, सोने चांदीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतविलेल्या ठेवीची रक्कम तसेच त्यावरील परतावा न देता गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंजिरी कौस्तुभ मराठे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

या गुन्ह्यात मराठे ज्वेलर्स-प्रवण मराठे ज्वेलर्स प्रा. लि. यांनी कॉसमॉस बँकेकडून स्टॉकच्या किमतीवर ६० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. आरोपींनी या बँकेकडून कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यामुळे बँकेचे त्यांना वसुलीची नोटीस पाठवली होती.

या प्रकरणी मयत मिलिंद ऊर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे (वय ५४), मंजिरी कौस्तुभ मराठे (वय ४८), नीना मिलिंद मराठे आणि प्रणव मिलिंद मराठे (वय २६, रा. रूपाली अपार्टमेंट, एरंडवणे) इतरांविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात शुभांगी विष्णू कुटे (वय ५९, रा. शिवतीर्थ नगर, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रणव मराठे ज्वेलर्सची लक्ष्मी रोड तसेच पौड रोड कोथरूड येथील शाखांमध्ये १४ जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपींनी ज्वेलर्सच्या विविध योजनांमध्ये रोख रक्कम, सोने,चांदी आदी गुंतवणूक करायला लावली तसेच फिर्यादींसह अनेक गुंतवणूकदारांची चार कोटी ३३ लाख दोन हजार ९७० रुपयांची फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले आहे.

मंजिरी मराठे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी विरोध केला. आरोपीचा प्रवण मराठे ज्वेलर्स प्रा. लि. या मुख्य शाखेच्या कामकाजात सहभाग होता. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना अटक करणे आवश्‍यक आहे, असा युक्तिवाद वाडेकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT