Crime-Scene
Crime-Scene 
पुणे

खंडणी उकळणाऱ्या मनोज अडसूळला मुंबईत अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - डॉक्‍टरकडून ७५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या मनोज तुकाराम अडसूळ ऊर्फ अत्रे यास अमलीपदार्थ व खंडणीविरोधी पथकाने अखेर मुंबईतील घाटकोपर येथून गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पाच लाख रुपये जप्त केले आहेत. न्यायालयाने त्यास पाच मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय ६९, रा. पर्वती) यांनी फिर्याद याप्रकरणी दिली होती. त्यांच्या डॉक्‍टर मुलाविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून मनोज अडसूळने ७५ लाखांची खंडणी घेतली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पळून गेला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. नंतर त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, अडसूळ हा मुंबईतील घाटकोपर येथे मित्राच्या घरी असल्याची खबर पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली. पथकाने बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता त्याला अटक केली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालयात हजर केले. 

या वेळी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी आरोपीने गंभीर गुन्हा केला आहे. त्याला कोणी मदत केली आहे का? आणखी कोणाकडून खंडणी घेतली आहे का ? खंडणीची रक्कम कोणा-कोणास दिली ? या गुन्ह्यातील दुसरा आरोपी जयेश कासट याच्यासोबत अडसूळचे काय संबंध आहेत, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी त्याला पाच मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. बचाव पक्षातर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT