Manoj Jarange Patil marathi news esakal
पुणे

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा अटक वॉरंट रद्द! पण कोर्टानं झापलं, नेमकं काय घडलं?

Arrest Warrant Against Manoj Jarange Patil Cancelled: कोर्टाने जरांगेंना न्यायालयाचा अवमान पुन्हा करू नये, अशी ताकीद दिली आहे. काही माध्यमांमध्ये जरांगेंनी कोर्टाबद्दल अवमानकारक भाष्य केले होते.

Sandip Kapde

मनोज जरांगे यांच्यावर १० वर्षांपूर्वीच्या एका नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. २०१३ मध्ये या प्रकरणाची नोंद झाली होती आणि जून महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु, जरांगेंनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे कोर्टासमोर हजर होण्यास असमर्थता दर्शवली होती.

उपोषण आणि प्रकृतीची खराब स्थिती-

मनोज जरांगे उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात किडनीच्या इन्फेक्शनमुळे ते दाखल झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना २ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते कोर्टासमोर हजर होऊ शकले नव्हते.

कोर्टासमोर हजर-

डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचा सल्ला दिल्यामुळे ते आज अॅम्ब्युलन्समधून कोर्टासमोर आले. कोर्टासमोर त्यांनी आपली प्रकृतीची माहिती देत अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. डॉक्टरांच्या अहवालावर आधारित कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले.

न्यायालयाचा अवमान आणि कोर्टाचे निर्देश-

कोर्टाने जरांगेंना न्यायालयाचा अवमान पुन्हा करू नये, अशी ताकीद दिली आहे. काही माध्यमांमध्ये जरांगेंनी कोर्टाबद्दल अवमानकारक भाष्य केले होते. न्यायालयाने त्यांना बोलताना काळजी घ्यावी, अशी सूचना दिली आहे.

न्यायालयाची ऑर्डर-

जरांगेंच्या प्रकरणात न्यायालयाने कायद्याचे योग्य पालन करत, जरांगेंच्या वैद्यकीय अहवालांची तपासणी केली. सरकारी वकीलांनी जरांगेंच्या अनुपस्थितीबद्दल आक्षेप नोंदविला होता, परंतु वैद्यकीय अहवालावरून कोर्टाने अटक वॉरंट रद्द केले. कोर्टाने जरांगेंना नव्याने बंद पत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरणाची पुढील सुनावणी-

या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयाने जरांगेंना यावेळी न्यायालयाचा अवमान करु नये, अशी समज दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT