कर्नल विनायक चव्हाण sakal
पुणे

"एनसीसी बटालीयन प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना अनेक चांगले अनुभव"

एनसीसीच्या २ गर्ल्स बटालियनचे प्रमुख कर्नल चव्हाण आणि कॅप्टन लक्ष्मण राजळे हे येत्या ३० ऑगस्टला सेवानिवृत्त होणार असून त्यानिमित्त सत्कार समारंभ योजित करण्यात आला होता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘कोरोना काळात एनसीसीच्या प्रशिक्षणाशी निगडीत अनेक आव्हाने समोर होती. ‘रिपब्लिक डे कॅम्प’साठी (आरडीसी) राज्यातील विविध भागातून एनसीसी कॅडेट्स येणार होते. त्यांचे प्रशिक्षण व आरोग्याची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी येत होत्या. परंतु त्यावर मार्ग काढत सर्व कर्मचाऱ्यांनी या कठीण काळात विशेष योगदान दिले. एनसीसी बटालीयन प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना आव्हानांबरोबर अनेक चांगले अनुभव ही मिळाले.’’ अशी भावना कर्नल विनायक चव्हाण यांनी व्यक्त केली .

एनसीसीच्या (पुणे) २ गर्ल्स बटालियनचे प्रमुख कर्नल चव्हाण आणि कॅप्टन लक्ष्मण राजळे हे येत्या ३० ऑगस्टला सेवानिवृत्त होणार असून त्यानिमित्त शनिवारी सत्कार समारंभ योजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कर्नल अनिरुद्ध वाले, कॅप्टन लक्ष्मण राजळे, कॅप्टन काशिफा इनामदार, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर रिता खंडागळे व दिपाली दास, चीफ ऑफिसर आशा धेंडे आदी उपस्थित होते.  

कर्नल चव्हाण यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये या बटालीयनच्या प्रमुखपदाचे पदभार स्विकारले होते. या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी विविध मोहिमा आणि उपक्रम राबविले. यामध्ये एनसीसी मुख्यालयाच्या परिसरात हर्बल गार्डनपासून इतर सुविधा उभारणीसाठी काम केले. कॅडेट्सच्या घराघरामध्ये वृक्षारोपणाची अनोखी मोहिम, फिट इंडिया, डिजिटल फोरम सारख्या विविध मोहिमा राबवल्या. तसेच कोरोना काळात त्यांनी लसीकरण मोहिमेंतर्गत नोडल ऑफिसर म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : इशान किशनने पाकड्यांना टप्प्यात घेऊन ठोकले; अभिषेक शून्यावर गेला म्हणून नाचले होते, रोहितचा जल्लोष

Kalamb Crime : मित्रानी दारू पाजून खून केल्याची घटना उघड; येरमाळा पोलिसांनी पाच संशयितना केली अटक

Latest Marathi News Live Update : बदलापूरमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीत सात दुकानं फोडली

VIDEO : भाईचा नाद करायचा नाय...रोहित शर्मा टीम इंडियाला चिअर करण्यासाठी चार्टर्ड प्लेनने कोलंबोत दाखल

Vadigodri News : वडीगोद्रीत स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न, चोरीचे साहित्य पोलीसाकडुन जप्त

SCROLL FOR NEXT