Many offenses of criminal nature dr Anil Ramod hide all illegal assets Information from CBI sakal
पुणे

Anil Ramod : डॉ. अनिल रामोडांकडून गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक चुका...आणि मोठी रोकड मिळवली; सीबीआयची माहिती

सर्व बेकायदेशीर मालमत्ता त्यांनी दडवून ठेवली आहे, सीबीआयची न्यायालयात माहिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भूसंपादनाच्या बदल्यात जादा नुकसान भरपार्इ देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेले पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या चुका केल्या आहेत.

लाचखोरीतून त्यांनी अनेक स्थावर मालमत्ता आणि मोठी रोकड मिळवली आहे. ही सर्व बेकायदेशीर मालमत्ता त्यांनी दडवून ठेवली आहे, अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयास दिली.

लाच घेताना अटक केल्यानंतर डॉ. रामोड यांना शनिवारी (ता. १०) सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या कोठडीसाठी सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये सीबीआयने ही माहिती न्यायालयास दिली.

भूसंपादनातील मोबदला प्रकरणात डॉ. रामोड यांनी आणखी काही जणांकडून लाच घेतली असल्याचा संशय आहे. लाच घेण्याची त्यांची पद्धत (मोडस ऑपरेंडी) समजून घेण्यासाठी त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी देण्याचा युक्तिवाद सीबीआयचे वकील अभय अरीकर यांनी केला.

या गुन्ह्यात डॉ. रामोड यांची सखोल चौकशी करण्यात येत असून त्यांचे निवासस्थान, तसेच कार्यालयातून सहा कोटी ६४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी डॉ. रामोड यांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत एका वकिलाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीची शहानिशा करून सीबीआयच्या पथकाने रामोड यांच्यावर कारवाई करून त्यांना शुक्रवारी (ता.९) पकडले.

या प्रकरणातील तक्रारदार वकील आणि डॉ. रामोड यांच्यात झालेले बोलणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. रेकॉर्डिंग तपासण्यासाठी डॉ. रामोड यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. डॉ. रामोड यांच्या घरात मोठी रोकड सापडली आहे. ही रोकड त्यांनी कोठून आणली, त्यांनी ही रोकड कोणी दिली, यादृष्टीने सखोल तपास करायचा आहे.

तपासासाठी रामोड यांना पाच दिवसांची कोठडी मिळावी, अशी विनंती ॲड. अरीकर यांनी न्यायालयास केली. डॉ. रामोड यांच्या वतीने ॲड. सुधीर शहा यांनी बाजू मांडली. डॉ. रामोड यांच्याकडून रोकड, तसेच मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपासासाठी सीबीआय कोठडीची आवश्यकता नसून, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, असे ॲड. शहा यांनी युक्तिवादात सांगितले. सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक आय. बी. पेंढारी यांनी डॉ. रामोड यांना न्यायालयात हजर केले.

डॉ. रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी :

सीबीआयने रामोड यांना अटक केल्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत रामोड सहकार्य करत नाहीत. ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी डॉ. रामोड यांना १३ जूनपर्यंत कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT