पुणे

उद्योगांच्या 7 क्षेत्रांत 'मराठा चेंबर' देणार उद्योजकांना पुरस्कार 

सकाळवृत्तसेवा

पुणे ः लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांतील उद्योजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरतर्फे (एमसीसीआयए) सात विविध क्षेत्रातील उद्योगांना गौरविले जाते. त्यासाठी अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत उद्योजकांना संधी आहे. त्याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन चेंबरने केले आहे.

समाजाचे आर्थिक स्वास्थ्य टिकविण्यात उद्योगांचा मोठा वाटा आहे. तसेच अर्थचक्राला गती देण्यातही उद्योगांची भूमिका मोलाची आहे. त्यात नाविन्यपूर्ण संकल्पना शोधून आणि त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या उद्योजकांना चेंबरतर्फे गेल्या 70 वर्षांपासून गौरविले जाते. त्यात टप्प्याटप्प्याने पर्यावरण, सीएसआर, महिला उद्योजकता, नवी पिढी आणि संरक्षण सिद्धता आदी क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. उद्योग क्षेत्रात "एमसीसीआयए'चा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो उद्योजक त्यांची माहिती "एमसीसीआयए'कडे पाठवितात. त्यातून सात क्षेत्रातील उद्योजकांची निवड चेंबरच्या परीक्षण समितीतर्फे केले जाते, अशी माहिती "एमसीसीआयए'चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.

चेंबरच्या या पुरस्कारांबद्दल आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दलचे अधिक तपशील www.mcciapune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच या बाबत चेंबरचे सतीश जोशी (मोबा. क्र. 9881127658) यांच्याकडेही अधिक माहिती मिळू शकेल.

पी. एन. सेफ्टी इंडस्ट्रीजचे सीईओ आणि हरीमालीनी ऍवॉर्डचे 2018 चे विजेते चेतन नलावडे म्हणाले, "नवे प्रॉडक्‍ट आणि डिझाईनबद्दल आमच्या उत्पादनाला मिळालेल्या पारितोषिकामुळे केवळ आमचा हुरूपच वाढला नाही तर आम्हाला देशभरातून नवे ग्राहक मिळाले.''

- रायका इंजिनिअरींग सोल्यूशन्सच्या मुख्य आणि रमाबाई जोशी ऍवॉर्डच्या 2019 च्या विजेत्या प्रिती रासकर म्हणाल्या, "पारितोषिकामुळे आमच्या संपूर्ण टिमचा हुरूप वाढला. तसेच त्यातून बाजारपेठेसाठी आवश्‍यक असलेली उत्पादन क्षमता आमच्याकडे आहे, याचा स्पष्ट संदेशही गेला.''

या साठी करता येतील अर्ज
- नाविन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकता (जी. एस. पारखे ऍवॉर्डस)
- पर्यावरणपूरक पुढाकार (डॉ.आर. जे. राठी ट्रस्ट)
- न्यू प्रॉडक्‍टस अँड डिझाईन (हरी आणि मालिनी जोशी ऍवॉर्ड)
- सामाजिक जबाबदारीची जाणीव- सीएसआर (बी. जी. देशमुख ऍवॉर्ड)
- महिला उद्योजक (रमाबाई जोशी ऍवॉर्ड)
- नव्या पिढीचा यशस्वी उद्योजक ( किरण नातू ऍवॉर्ड)
- संरक्षण क्षेत्रातील उत्पादन (ब्रिगेडिअर एस. बी. घोरपडे ऍवॉर्ड)

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT