Maratha Reservation
Maratha Reservation 
पुणे

Maratha Reservation : शिवनेरीच्या पायथ्याशी पाच गावातील मराठा समाजाचे साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर परिसरातील येणेरे, विठ्ठलवाडी, काले, दातखिळेवाडी,काटेडे या पाच गावातील मराठा बांधवांनी आज शुक्रवार ता.२७ पासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

उपोषणापूर्वी पोलीस व महसूल प्रशासनास पत्र देण्यात आले यानंतर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठींबा देत असल्याचे जाहीर करून उपोषणास सुरवात करण्यात आली.यावेळी बाजीराव ढोले,

अमीत ढोले,प्रदीप घोगरे, विश्वास काळे,जयवंत दातखिळे,मिननाथ दातखिळे,अशोक कबाडी, कुलदीप नायकोडी,रविंद्र पानसरे,शशिकांत पानसरे,चंद्रशेखर चिलप, प्रवेश देवकर,नरेंद्र देवकर,दत्तात्रेय ढोले,उल्हास नवले,विनोद देवकर, म्हातारबा ढोले,बाबु घोगरे आदी पन्नासहून अधिक मराठा समाज बांधव उपस्थित होते.

जुन्नर परिसरातील तीसहुन अधिक गावांतील मराठा बांधव शिवनेरीच्या पायथ्याशी दररोज एक दिवस साखळी उपोषण करणार आहेत. सकल मराठा समाजाचे सुनिल ढोबळे,संदेश बारवे, नरेंद्र कासार,विवेक खंडागळे,विवेक पापडे,सौरभ गुंजाळ,संजय खंडागळे,सचिन चव्हाण आदींनी नियोजन केले आहे .

मराठा समाजातील तरुण,महिला तसेच ज्येष्ठांकडून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील विविध गावांमधील मराठा समाजाकडून अनेक गावांतून आरक्षण मिळेपर्यत राजकीय पुढाऱ्यांना बंदीचे फ्लेक्स लावण्यात आले असून साखळी उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे.

तेजेवाडीला साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तालुक्यातील प्रमुख व मोठया गावातूनही उपोषणाला पाठींबा मिळत आहे.अनेक गावातून राजकीय नेत्यांना गावबंदीचे फ्लेक्स झळकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kuwait Building Fire: कुवेतच्या दुर्घटनेतून भारत आणि जगाने काय शिकण्याची गरज? कामगारांचे कल्याण कसं साध्य होईल?

Raksha Khadse: जेसीबीतून फुलांचा वर्षाव, मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंची जल्लोषात एन्ट्री

Shubman Gill : गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमनसह आवेश खान मायदेशात परतणार, टीम इंडियात चाललंय तरी काय?

Panchayat 3: स्वप्नांना वय नसतं! गंभीर आजार जडला, तरीही हार मानली नाही; 'पंचायत'मधील अम्माजींचा प्रेरणादायी प्रवास

Latest Marathi Live Updates: मनोज जरांगेंवर रूग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT