Chhagan Bhujbal vs Sharad Pawar esakal
पुणे

''आरक्षणावरील बैठकीपूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बारामतीमधून फोन'', भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले...

व्ही.पी. सिंग यांनी जे आरक्षण देऊ केलं होतं, त्याची अंमलबजावणी शरद पवार यांनी केल्यामुळे आम्ही त्यांचे आभारही मानले होते.

मिलिंद संगई

''तुमचा (शरद पवार) राग छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर असेल पण या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे.''

बारामती : आरक्षणाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज बारामतीतून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट टीकास्त्र सोडले. बारामतीत आयोजित जनसन्मान मेळाव्यात भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले, काही लोकांचा असा प्रयत्न आहे की आरक्षणाच्या मुद्यावरुन आपापसात भांडणं, मारामा-या व्हाव्यात. मात्र, आमची भूमिका अशी आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गानेच आम्ही जाणार आहोत, फक्त ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, एवढी काळजी फक्त घ्यावी.

राज्य सरकारने मुंबईत चार दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्यावर जी बैठक सरकारने बोलाविली, त्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी त्याला उपस्थित राहावे, असा प्रयत्न होता. यात वातावरण शांत व्हावे असा प्रयत्न होता. यात मी स्वत: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना फोन केला, जितेंद्र आव्हाडांनाही फोन केला आणि त्यांना सांगितलं की काहीही करा, पण शरद पवार साहेबांनाही या बैठकीला बोलवा. व्ही.पी. सिंग यांनी जे आरक्षण देऊ केलं होतं, त्याची अंमलबजावणी शरद पवार यांनी केल्यामुळे आम्ही त्यांचे आभारही मानले होते.

राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी त्या बैठकीला यायला हवं होतं, पण असं सांगितलं जातं की, सगळे त्या बैठकीला येणार होते, पण पाच वाजता बारामतीहून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. बारामती सर्वच समाजाचे मतदार आहेत, सुनेत्रा पवारांप्रमाणेच त्यांनी सुप्रिया सुळेंनाही मते दिली आहेत, या सर्वांचे संरक्षण करण्याचे काम तुमचे नाही का? असा सवाल त्यांनी केला.

भुजबळ पुढे म्हणाले, तुमचा राग छगन भुजबळ, अजित पवार यांच्यावर असेल पण या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे. हे सगळं मिटविण्यासाठी का तुम्ही या बैठकीला आमच्यासोबत येत नाही, नंतर पाठीमागून सल्ले द्यायचे, राज्य पेटविण्याचे उद्योग सध्या सुरु आहेत, निवडणुकीच्या काळात एकमेकांविरुध्द लढू, पण राज्यातील सामाजिक प्रश्न सोडविताना मुद्दाम त्याच्यावर बहिष्कार टाकायचा यायचंच नाही आणि ओबीसी व मागासवर्गीयांना वा-यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही. अशा प्रश्नावर सर्वांनी एकत्र यायला हवे, असे भुजबळ शेवटी म्हणाले. दरम्यान, भुजबळ यांनी आरक्षणाचा विषय काढताच सभेत उपस्थित काही युवकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT