Maratha Reservation hadapsar agitation sakal
पुणे

Maratha Reservation : हडपसर परिसरात साखळी उपोषण, कँडल मार्चने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाढतोय पाठिंबा

मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा जलत्यागासह आंदोलन सुरूच ठेवल्याने राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला प्रतिसाद वाढू लागला आहे.

कृष्णकांत कोबल

हडपसर - मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा जलत्यागासह आंदोलन सुरूच ठेवल्याने राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाला प्रतिसाद वाढू लागला आहे. सध्या परिसरात सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून साखळी उपोषण केले जात आहे. त्याला समाजबांधवांकडून दिवसागणिक पाठिंबा वाढत आहे.

ससाणेनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंत्री मार्केट समोरील उड्डाणपुलाखाली उपोषणाला सुरुवात केली आहे. साडेसतरानळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेली तीन दिवसांपासून कार्यकर्ते व समाज बांधवांकडून उपोषण केले जात आहे.

मांजरी बुद्रुक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषण सुरू केलेले आहे. समाजाचे अनेक बांधव उपोषण स्थळी उपस्थित राहत आहेत. वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा - लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून जात आहे.

महादेवनगर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय जवळ कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर ठेवून आंदोलन सुरू केले आहे.

कँडल मार्चचे आयोजन -

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सायंकाळी (ता. २) महादेवनगर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय ते मांजरी बुद्रुक गावठाण तसेच मांजरी खुर्द येथे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT