MarathaKrantiMorcha valchandnagar bandh
MarathaKrantiMorcha valchandnagar bandh  
पुणे

निरवांगी, खोराेची मध्ये कडकडीत बंद

राजकुमार थोरात

वालचंदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणाची तातडीने अमंलबजावणी करण्यासाठी आज गुरुवार (ता. २६) ला इंदापूर तालुक्यातील निरवांगी, खाेरोची येथे कडकडीत बंद पाळण्यात आली. तर गोतोंडीमध्ये बंद पाळून बारामती-इंदापूर राज्यमार्गावरती रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

मराठा समाजाला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यामध्ये आंदोलने सुरु आहेत. आज नीरा नदी काठच्या निरवांगी व खोरोची गावातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. निरवांगी गावामध्ये युवकांनी रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त केला. दोन्ही गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गोतोंडी गावामध्ये ही बंद पाळून बारामती-इंदापूर राज्य मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये गोतोंडी, शेळगाव, शिरसटवाडी, नलवडेवस्ती परीसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. याप्रसंगी आंदोलनामध्ये जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब  शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी वालचंदनगरचे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे, इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT