पुणे

मराठी भाषेचे संवर्धन होणे आवश्यक

CD

कळसकरवाडीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

दहिवडी, ता. ३ : मराठी भाषा ही साधी, सरळ, सोपी आणि गोडवा जपणारी आहे. हा गोडवा जपायचा असेल, तर मराठी भाषेचे संवर्धन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बालभारतीचे सदस्य ताराचंद्र आवळे यांनी केले.
कळसकरवाडी (ता. माण) येथे श्री जोतिबा मंदिर समिती, गाडगेबाबा समृद्ध जाणिवा प्रेरणा केंद्र व मराठी भाषा गौरव दिवस समिती यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी गांधीवादी कार्यकर्ते जीवन सर्वोदयी, तसेच संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक परशुराम घोरपडे, विठ्ठल पवार, माजी वरिष्ठ मुख्याध्यापक ना. द. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
ताराचंद्र आवळे म्हणाले, ‘‘दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेमध्ये अनेक शब्द इतर भाषांमधील वापरले जातात. हे असेच घडत गेले तर मराठी भाषा ही मराठी राहणार नाही. स्थानिक भाषा जर जगल्या, तर संवादाची मराठी भाषा अधिक समृद्ध होईल व ती आपले अस्तित्व टिकवून ठेवेल.’’
जीवन सर्वोदयी म्हणाले, ‘‘बालवयातील संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आपली मुले मराठी शाळेत पाठवा. वाचनालयात जाऊन पुस्तके वाचा व आपल्या जीवनाला आकार द्या. नवनव्या साहित्यिकांची पुस्तके वाचा, त्यांना अभिप्राय द्या. यातून अधिक सकस व दर्जेदार साहित्य आपल्या हाती पडेल व मराठी भाषा दर्जेदार होईल.’’
या वेळी ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले, तसेच एक हजार पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. यानिमित्ताने हस्ताक्षर, निबंध, काव्यवाचन, कथा लेखन, कथाकथन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कळसकरवाडी, कुळकजाई, श्रीपालवन, आंधळी, मलवडी, गाडेवाडी, शिंदी, भांडवली अशा विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक परशुराम घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. सलिमा शेख यांनी सूत्रसंचालन केले, तर अजय घोरपडे यांनी आभार मानले. या वेळी प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

............
छायाचित्र
MLV26B07332
कळसकरवाडी (ता. माण) : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांसह ताराचंद्र आवळे, जीवन सर्वोदयी आदी मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)

......पूर्ण....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT