Pimpri-chinchwad 
पुणे

चिंचवडमध्ये नागरिकांचा स्वयंस्फुर्तीने बंद

सकाळवृत्तसेवा

वाल्हेकरवाडी : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत चिंचवड, वाल्हेकरवाडी व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून संपला पाठींबा दिला. यावेळी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये आंबेडकर अनुयायांनी महापुरुषांच्या नावाने जयघोष केला. यावेळी असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. घटनेचा निषेध करण्यासाठी दलित बांधवानी जमून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा नागसेन वस्ती बिजलीनगर येथून वाल्हेकरवाडीतील रत्न्संभव बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आला. सकाळपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकर गेले आता नाम फाउंडेशनचं काम कोण बघणार? मुलगा मल्हारने हात जोडून केली 'ही' विनंती

Gyanesh Kumar : डॉ. आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या ज्ञानेशकुमार यांच्या पापाचा घडा भरलाय; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

Inner Ring Road : मांजरी खुर्द पाठोपाठ कोलवडीतही ‘इनर रिंग रोड’साठी सकारात्मक प्रतिसाद; १५ ऑक्टोबरपासून होणार जमीन मोजणी

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार; आंतरराष्ट्रीय कायदा अन् मानवाधिकारांसाठी मोठं काम

SCROLL FOR NEXT