पुणे

'एमआयटी'मध्ये होणार जागतिक उद्योजकता संमेलन

जनार्दन दांडगे

लोणी  काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे तर्फे शनिवार दि.१६ डिसेंबर व रविवार दि.१७ डिसेंबर २०१७ या दरम्यान जागतिक पातळीवरील दोन दिवसीय उद्योजकता संमेलन राजबाग, लोणी-काळभोर येथे आयोजित करण्यात आले आहे. ई-कॅफे, एफआयसीसीआय आणि एमसीसीआयए यांच्या सहकार्याने जगातील सर्वात मोठे उद्योजकता संमेलन भरणार आहे.

या दोन दिवसीय उद्योजकता संमेलनाचे शनिवारी सकाळी १०.०० वाजता उद्घाटन होणार आहे. या समारंभासाठी भारताच्या अन्न प्रक्रिया विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील -निलंगेकर, निती आयोगाच्या अटल सृजन मोहिमेचे अतिरिक्त सचिव व संचालक श्री. आर. रामानंद, इंडिया-जपान पार्टनरशिपचे अध्यक्ष संजीव सिन्हा आणि अमेरिकेमधील मकरंद जावडेकर व कॅनडा येथील राज बरार हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. विद्या जयरामन या बीजभाषण देणार आहेत. 

जगातील सहा खंडातील १०५ शहरापैकी व त्यापैकी भारतातील २५ शहरांचे ३ हजार उद्योजकांच्या बैठका घेण्यात आल्या आणि जगातील ४५ हजार उद्योजक जोडले गेले आहेत. 

एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेतर्फे आयोजित केलेल्या या उद्योजकांसाठीच्या संमेलनात नवनवीन कल्पना, प्रतिसाद, तसेच, हजारो उद्योजकांना प्रेरणा देण्याचे कार्य या संमेलनातून होणार आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या मते तरूण उद्योजक नवीन भारताची निर्मिती करतील. भारत सरकारचे उद्योजक धोरण ठरविण्यासाठी या संमेलनातील चर्चेचा उपयोग होईल.  

या संमेलनात शहरातील ई-कॅफेचा महिला उद्योजक पुरस्कार, महाराष्ट्र तरूण उद्योजक पुरस्कार व इंडिया टेक-आयडिया पुरस्कार/जागतिक टेक आयडिया पुरस्कार हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 

या उद्योजक संमेलनाचा समारोप समारंभ रविवारी दुपारी १.३० वाजता होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT