Sawai Gandharva Pandit Nana Mulye
Sawai Gandharva Pandit Nana Mulye 
पुणे

...इथेच वादकाची खरी सत्त्वपरीक्षा; तबलावादक पं. नाना मुळे यांचे मत

सकाळवृत्तसेवा

पुणे, ता. 14 : ''तबल्यावर कंठसंगीत वाजवणे सर्वांत कठीण असते. गाण्याची लय, बंदिश आणि अर्थ समजून वाजवावे लागते. त्याबरोबरच रागाच्या स्वभावानुसार ठेका बदलत न्यावा लागतो. तबलावादकाने कुणाचेही गाणे पाडायचे नसते. एखादा गायक तालाला कमजोर असेल, तरी त्याला सांभाळून घेत उत्तम साथ करायची असते. इथेच तबलावादकाची खरी सत्त्वपरीक्षा असते,'' असे मत तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले. 

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात 'वत्सलाबाई जोशी पुरस्कार' प्रदान केला जातो. यंदा या पुरस्कारासाठी पं. मुळे यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 'अंतरंग' कार्यक्रमात पं. मुळे यांची श्रीनिवास जोशी यांनी मुलाखत घेतली. 

पं. मुळे यांनी अनेक वर्षे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची साथसंगत केली असून, या वाटचालीला मुलाखतीच्या निमित्ताने उजाळा मिळाला. शिवाय, लहान वयात तबलावादन सुरू केल्यापासून मोठमोठ्या गुरूंकडून तबला शिकण्याची मिळालेली संधी, प्रत्येक गुरूकडे मागितलेला तबलावादनाच्या ज्ञानाचा प्रसाद, संगीत नाटकांसाठी गाणी बसविताना आणि प्रत्यक्ष रंगमंचावर ती गाणी सादर करताना गायक आणि तबलावादक यांच्यात होणाऱ्या गमतीजमती सांगत त्यांनी शब्दांची मैफल रंगवली. या वेळी श्रोत्यांना त्यांच्या तबलावादनाची झलकही अनुभवता आली. दरम्यान, 'षड्‌ज' या कार्यक्रमात प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील माहितीपटही दाखवण्यात आला. 

मैफलींमध्ये वाजवणे हीच आवड 
''कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या 400 प्रयोगांसाठी, तर 'मत्स्यगंधा' नाटकाच्या 350 प्रयोगांसाठी आपण तबलावादन केल्याचे पं. मुळे यांनी सांगितले. 'कट्यार' पाहण्यासाठी मदन मोहन, आर. डी. बर्मन असे मोठमोठे संगीतकार येत आणि तबल्यासाठी विशेष दादही देत. मला चित्रपटांमध्ये तबला वाजवण्यासाठी अनेकदा विचारणा झाली; परंतु मैफलींमध्ये वाजवणे हीच माझी आवड असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही,'' असेही पं. मुळे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

कलावंताने 'हा काय गातो', 'तो काय वाजवतो', असे म्हणत बसण्यापेक्षा स्वत:ला सतत शोधणे महत्त्वाचे असते. कलेला वय नसते, हे माझ्या डोक्‍यात फिट बसले आहे. त्यामुळे लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि त्यांना साथसंगत करायला देखील मी बसतो. त्यांच्याकडूनही शिकायला मिळते. त्यामुळेच मी कायम जमिनीवर राहिलो. 
- पं. नाना मुळे, तबलावादक 

आज 'षड्‌ज' आणि 'अंतरंग'मध्ये 

  • - रजत कपूर दिग्दर्शित 'तराना' लघुपट 
  • - पी. के. साहा दिग्दर्शित 'सारंगी : द लॉस्ट कॉर्ड' लघुपट 
  • - सर्जनाची आव्हाने : महेश काळे, आरती अंकलीकर-टिकेकर, श्रीनिवास जोशी यांचा स्वरसंवाद 
  • (वेळ : सकाळी दहा, स्थळ : सवाई गंधर्व स्मारक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT