Sanjay Kakade 
पुणे

गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार: संजय काकडे

अश्विनी जाधव

पुणे : अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात निवडणूकीच्या निकालाबाबत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी धक्कादायक वक्तव्य केले असून, गुजरात निवडणुकीत पक्षाचा पराभव आणि काँग्रेसचा विजय होणार, असे भाकीतच काकडेंनी केले आहे.

गुजरात निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला लागली असताना भाजपला पक्षातूनच घराचा आहेर मिळाला आहे. एका सर्वेक्षणाच्या आधारावर काकडे यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपला सत्ता स्थापने इतपत बहुमत मिळणार नाही, असे काकडे म्हणत आहेत.

गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र सध्याचा स्थितीत असणारा निगेटिव्ह फॅक्टर, आतापर्यंत देशपातळीवर मोदींच्या माध्यामातून झालेला विकास, स्थानिक विकास कुठेही या निवडणुकीच्या प्रचारात समोर आलेला नाही. त्यामुळे हेच मुद्दे पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरु शकतील, असे काकडे यांचे म्हणणे आहे. 

मात्र इतके होऊनही जर भाजपचा विजय झाला, तर तो केवळ मोदींचा करिष्मा असेल त्याचा पक्षाशी आणि नेत्यांशी संबंध नसेल असेही काकडेनी स्पष्ट केले आहे. यापुर्वी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ९२ जागा मिळतील असा अंदाज काकडे यांनी वर्तवला होता. हा अंदाज जवळपास खरा ठरला होता. पालिका निवडणुकीत भाजपचा ९८ जागांवर विजय झाला होता. गुजरातमधील निवडणुकीचं सर्वेक्षण अशाच निकषांवर केले आहे. यामुळे भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता कमीच आहे, असे काकडेंचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT