Baramati
Baramati 
पुणे

अधिकाधिक विकास निधी आणण्यासाठी प्रयत्नशील - प्रविण आटोळे

संतोष आटोळे

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्यातील मोजक्याच भागाचा विकास झाला आहे. मात्र आता भाजप सरकारच्या माध्यमातून सर्वच भागाच्या विकासासाठी अधिकाधिक विकास निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष व सावळचे सरपंच प्रविण आटोळे यांनी केले.

सावळ (ता.बारामती) येथे खासदार शरद पवार यांच्या खासदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट बंधारा कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आटोळे बोलत होते. यावेळी माजी सरपंच विठ्ठल आटोळे, दत्तात्रय विरकर, दत्तात्रय पवार, मारुती आटोळे, अनिल आवाळे, गंगाराम विरकर, युवराज आटोळे, दिपक आवाळे, जंम्बुकुमार धवडे, केशव साबळे, ग्रामसेवक रावबा गवंड, ठेकेदार दत्तात्रय वाबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आटोळे म्हणाले, सावळ येथील विकास कामांसाठी मागील सरकारच्या काळात दुजाभाव केला जात होता. मात्र आता भाजपा सरकारच्या माध्यमातून गावासह परिसरातील गावांच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणू अशी ग्वाही दिली. व विकासकामांमध्ये राजकारण न करता विकासासाठी नेहमीच पक्षीय जोडे बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सर्व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक रावबा गवंड यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT