Walchandnagar
Walchandnagar 
पुणे

तेजस्विनी राणे यांना जिजाऊ पुरस्कार

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : जंक्शन (ता.इंदापूर) येथील साईप्रसाद शिक्षण संस्थेच्या संस्थापिका तेजस्विनी विजय राणे यांनी  ग्रामीण भागातील महिलाचे सक्षमीकरण व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष  प्रयत्न केल्याबद्दल त्यांना वालचंदनगर येथील शिवयुग प्रतिष्ठानतर्फे जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

तेजस्विनी राणे यांचे शैक्षणीक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांनी 2006 मध्ये जंक्शन साईप्रसाद शिक्षण संस्थेच्या डॅफोडिल्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये शिक्षण देत आहेत .तसेच त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करुन अकुशल महिलांना कुशल करण्यासाठी मोलाची मदत केली. त्यांच्या प्रयत्नामुळे आज ग्रामीण भागतील सुमारे 50 महिलांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांना अनेक अडचणींना मात करुन विद्यार्थ्यांचे व महिलांचे हित जोपासल्याबद्दल वालचंदनगर येथील शिवयुग प्रतिष्ठानने त्यांना शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जिजाऊ पुरस्कार देवून गौरविले. यावेळी पंचायत समिती सदस्या डॉ.शैला फडतरे,कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे, रणगावच्या सरपंच सुषमा रणमोडे, उपसरपंच नीता तेलगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू पवार, उपाध्यक्ष महेश बोंद्रे, योगेश कणसे, प्रकाश साळुंके, गजानन बोंद्रे, बापू रणमोडे उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT