junnar
junnar 
पुणे

शिवजयंती निमित्त जुन्नरला छायाचित्र स्पर्धा

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नरला  शिवजयंती उत्सवाचे निमित्ताने जुन्नर पर्यटन विकास संस्था व जुन्नर तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या सयूंक्त विद्यमाने "छायाचित्रे स्पर्धा व प्रदर्शन श्री शिव छत्रपती महाविद्यालयात भरविण्यात आले आहे.

छायाचित्रे स्पर्धा व प्रदर्शनाचा विषय  जुन्नरमधील निसर्ग, गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तू असा ठेवण्यात आला आहे. यात शंभरहुन अधिक स्पर्धकांनी  सहभाग घेतला. छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी आमदार शरद दादा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संजय काळे, नगराध्यक्ष शाम पांडे आदी मान्यवर तसेच एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती. छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन यशस्वीपणे करण्यासाठी जुन्नर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे सहकार्य लाभले.

आमदार सोनवणे यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सभापती संजय काळे यांचे भाषण झाले. सत्यशीलदादा शेरकर युवा मंचाचे स्पर्धेसाठी सौजन्य लाभले आर्या, आमंत्रण, पर्णकुटी कृषी पर्यटन, ब्रेक आऊट कंपनी, जुन्नर पर्यटन, तोरणा इंफॉर्मटिक्स आदीनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले. विनायक खोत यांनी सूत्रसंचलन केले. मनोज हाडवळे यांनी आभार मानले. हे प्रदर्शन पुढील दोन दिवसांसाठी शिवजन्म भूमीत येणाऱ्या सर्व पर्यटक, शिवप्रेमींसाठी खुले राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT