magar college
magar college 
पुणे

मगर महाविद्यालय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

कृष्णकांत कोबल

मांजरी : “खेळामुळे आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती व नेतृत्व गुण विकसित होत असतात. तसेच खेळामुळे शरीर व मन सदृढ बनते त्यातून निकोप समाज निर्मिती होते. त्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अग्रही असून खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्यास कटिबद्ध आहे,'' असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी व्यक्त केले.

महादेवनगर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू रेवती देवस्थळे, श्री. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त राहुल चव्हाण, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू  संजय मोतलिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, प्रसिद्ध गायिका शेफाली कुलकर्णी, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी यांना बक्षिसे व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन संदीप कदम बोलत होते.

अॅड. कदम म्हणाले,"गेल्या काही वर्षापासून बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणावर खेळण्यास संस्थेतील खेळाडूंना संधी मिळते. त्यामुळे विविध शाखेतील विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.”  

महाविद्यालयातील राष्ट्रीय खेळाडू मृणाल पिंजण, संदीप भगत, शंतनू पांगारकर, मयुरी जगताप, तुषार पाटील, मोनाली हरपळे, निखील जाधव, अनिकेत डामसे, सर्फराज पठाण, सुरज कदम, शुभम सुरवसे यांना गौरवण्यात आले. तसेच दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया खेलो या क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक संपादन केल्याबद्दल अवंतिका नराळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.     

महाविद्यालयाच्या प्राचार्या शर्मिला चौधरी यांनी प्रास्ताविक केले.  उपप्राचार्य भाऊसाहेब बेंद्रे, आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, प्रा. शोभावती महाजन, प्रा. प्रितम ओव्हाळ, प्रा. संजीव पवार, प्रा. सचिन शहा,  शुभांगी औटी, प्रा. धीरज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

खेळाडू  देवस्थळे म्हणाल्या, "खेळाडूंनी खेळा बरोबरच अभ्यासालाही प्राधान्य द्यावे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर करावा तसेच खेळाकडे करिअर म्हणून पाहावे.''

प्रा. मंजुषा भोसले व प्रा. भागवत भराटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. प्रितम ओव्हाळ, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. मेघना भोसले, प्रा. शहाजी शिंदे, डॉ. प्रवीण ससाणे, सागर गुंडर्गे, मृणाल पिंजण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT