Persona
Persona 
पुणे

आपली क्षमता ओळखून स्वतःशी स्पर्धा करावी - सयाजी शिंदे

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : युवकांनी करिअर घडविताना आपली क्षमता ओळखून स्वतःशी स्पर्धा करावी. जीवनाला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहून आपले ध्येय गाठावे असा संदेश अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्सोना फेस्टीवल २०१८ मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दिला.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ आयोजित दुसऱ्या पर्सोना फेस्टीवल-२०१८ मध्ये सेलिब्रिटी मीट कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे यांनी वरील संदेश दिला. यावेळी एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेत्री अम्रिता थापर, अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री सई ताम्हणकर, एमआयटीच्या कार्यकारी संचालिका ज्योती ढाकणे, मिटकॉमच्या संचालिका सुनीता कराड, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील राय, विश्वशांती संगीत कला अकादमीचे सचिव अदिनाथ मंगेशकर उपस्थित होते.

यावेळी सयाजी शिंदे म्हणाले,"प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून विविधता मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे माझ्यातील कलाकार लोकांच्या समोर मांडण्यासाठी मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. दिवंगत प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांनी मला स्वतःच्या शैलीमध्ये जगण्याचे शिकवले. स्वतःला मेहनत करावी लागते, दुसऱ्याच्या भरोशावर यश मिळवता येत नाही. त्यामुळे युवकांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण करून स्वतःचे पंख आणि स्वतःचे अभाळ निर्माण करण्याची क्षमता ठेवावी व त्यानुसार वाटचाल करावी." निसर्गाबाबत असलेली आवड जपण्यासाठी दुष्काळी भागामध्ये वृक्षलागवड करून त्यातून मानसिक समाधान व आनंद मिळवत असल्याचे सयाजी शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्सोना फेस्टच्या माध्यमातून युवकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. तसेच भविष्यात नव कलाकारांना दिशा देणारा हा फेस्टीवल ठरेल असे मत दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी यावेळी मांडले.

कार्याक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ मंगेशकर यांनी केले. सूत्रसंचालन अभिनेत्री अलिफिया कपाडिया, पायल शहा आणि स्वप्निल शिरसाठ यांनी केले. दरम्यान दिग्दर्शक जब्बार पटेल, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, मिस इंडिया अम्रिता थापर, अभिनेत्री सई ताम्हणकर यांना सेलिब्रिटी ऑफ एमिनेन्स तर अमेय वाघ याला युवा सेलिब्रिटी ऑफ एमिनेन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT