Manjri
Manjri 
पुणे

मांजरीत रेल्वेगेटवर वारंवार वाहतूक कोंडी

कृष्णकांत कोबल

मांजरी : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे फाटक क्रमांक तीन मध्ये वारंवार बिघाड होण्याचे तसेच वाहने धडकून फाटक तुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारामुळे फाटक बंद राहिल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना  करावा लागला.

मांजरी बुद्रुक - वाघोली रस्त्यावर मांजरी बुद्रुक येथे रेल्वे गेट क्रमांक तीन आहे. सध्या या रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. त्यातच नवीन बसविण्यात आलेल्या रेल्वे फाटक मध्ये वारंवार बिघाड होत आहेत. याशिवाय अवजड वाहने धडकून गेट तुटण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सायंकाळी असेच गेट तुटल्याने  कामावरून घरी परतणारे नोकरदार, शाळेतून घरी जाणारे विद्यार्थी आणि इतर सर्व वाहन चालक यांना वाहतूक कोंडीचा सामना करीत येथे काही तास अडकून पडावे लागले. रेल्वेगेटवर झालेल्या  वाहतूक कोंडीच्या रांगा एक किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या होत्या.काही मिनिटांसाठी गेट उघडल्यानंतर रेल्वे रुळावरच मोठी गर्दी झाली होती. त्यातच येणाऱ्या रेल्वेच्या आवाजाने नागरिक चांगलेच घाबरून गेले होते. 

येथ रेल्वे फाटक तुटून वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार सारखा होत आहे. याशिवाय दररोजच्या रेल्वेच्या वाढलेल्या वारंवारितेमुळे गेट बंद राहत आहे. त्यामुळे येथील वाहतूक मंदावत चालली आहे. 

रेल्वे फाटकाची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी. येथे वाहतूक पोलीस नेमावेत तसेच फाटकाच्या दोन्ही बाजूला दुभाजक घालावेत अशी मागणी यावेळी कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी केली आहे.

उड्डाणपुलाचे काम कधी ?
येथील उड्डाण पुलाच्या कामाला मंजुरी मिळून निविदाही झाली आहे. मात्र अद्याप कामास सुरुवात झालेली नाही. यापूर्वी तीन वेळा भूमीपूजन होऊनही पुलाचे काम झाले नाही, तशी परिस्थिती यावेळीही होणार नाही ना ? अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT