ncp Agitation
ncp Agitation  
पुणे

पुणे - हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

संदिप जगदाळे

हडपसर (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपतींच्या भल्यासाठी कार्यरत आहेत. आज देश उद्योगपतीच चालवित असून केंद्र सरकार हजारो कोटी रूपयांचे कर्ज माफ करत आहे. निरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देश सोडून पळून गेले. त्यामुळे देशातील बँका बुडाल्या. देश उद्योगपती चालवीत असून केंद्र सरकार हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ करत आहे, भाजपाचे सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला.

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आशीर्वादाने हजारो कोटींचे भ्रष्टाचार होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने येथील गांधी चौकात आंदोलन झाले, यावेळी चेतन तुपे बोलत होते. 

आंदोलनात नगरसेविका वैशाली बनकर, नंदा लोणकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा वासंती काकडे, नारायण लोणकर, भानुदास शिंदे, प्रवीण ताथोड, सुनील बनकर, सागरराजे भोसले, कलेश्वर घुले, राकेश कामठे, अतुल तरवडे, संतोष रजपूत, डॉ. शंतनू जगदाळे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना चेतन तुपे म्हणाले, निरव मोदी 11 हजार या बुडवून पळून जातो, त्याला पंतप्रधान मोदी दावस मध्ये बरोबर घेऊन जातात, ही बाब बँकेने निदर्शनास आणून देखील दुर्लक्ष केले, निरव मोदी हा मुकेश अंबानीचा नातेवाईक व गव्हर्नर अंबानीचा नातेवाईक असल्याने कानाडोळा केला जातो, शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी टाळाटाळ केली जाते, सत्तेतील मंत्री दिवाकर रावते अकलेचे तारे तोडतात शेतकऱ्यांना पैसे दारात देऊन येऊ का असे विचारून अपमान करतात. बँकांच्या पैशाच्या गैरव्यवहारामुळे आर्थिक हानी होत आहे. अनेक उद्योगपतींना हजारो कोटी कर्ज माफ केले जाते, विद्यार्थ्यांना फी नसेल तर शाळेत घेतले जात नाही हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT