shivneri
shivneri 
पुणे

शिवनेरीवरील कडेलोटकड्याच्या प्रवेशद्वाराच्या दगडास चीर

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरीवर असलेल्या कडेलोट कड्याकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस असणाऱ्या दगडी चौकटीच्या एकसंघ दगडास चीर गेली आहे. यामुळे हे वैभवशाली वास्तुशिल्प भविष्यात कोसळण्याची भीती शिवप्रेमी व्यक्त  करत असून पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी शिव जन्मभूमी संवर्धन समितीने केली आहे.

किल्ले शिवनेरी पायरीमार्ग ते अगदी कडेलोट मार्गापर्यंत पुरातत्वीय वास्तूची देखभाल व दुरुस्ती ही पुरातत्व विभागाकडे आहे. कडेलोटासह यापैकी अनेक वास्तूंची दुरुस्ती करण्यात आली असून काही कामे सुरू आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी कडेलोट कड्याची दुरुस्ती करण्यात आली परंतु सतत ऊन, वारा, पाऊस झेलत उभ्या असलेल्या शिल्पास धोका होऊ शकतो. त्याप्रमाणे येथील चौकटीच्या दगडास चीर गेली आहे. त्यावर दगडी भिंतीचे वजन आहे. 

किल्ले शिवनेरील या कडेलोट टोकास येऊन येथून दिसणाऱ्या सृष्टी सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देतात सेल्फी काढतात परंतु अनेकांचे अशा बाबींकडे लक्ष जात नाही असेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

कडेलोट कड्याच्या छोट्या दगडी दरवाजातून  पर्यटक कडलोट येथे सेल्फी घेण्यात दंग दिसले परंतु कडेलोटच्या प्रवेशद्वाराच्या या गंभीर बाबीकडे कोणाचे लक्ष गेले नाही.  एकेकाळी जमीनदोस्त होऊ पाहणाऱ्या कडेलोटच्या या वास्तुची दुरुस्तीचे काम दहा बारा वर्षांपूर्वी झाले आहे. वास्तुची पौराणिकता थोडीदेखील कमी होणार नाही याची काळजी  पुरातत्व विभागाने कायम ठेवत अगदी हुबेहूब पुरातन वास्तूच्या स्वरूपात दुरुस्तीचे बांधकाम केले.

पूर्वी असलेला छोटा दरवाजा एकच मनुष्य एका वेळी प्रवेश करील तेवढाच ठेवण्यात आला. त्या दरवाजाचे बांधकामही उत्कृष्ट केले गेले. परंतु अलिकडे याच दरवाजाच्या चौकटीला भार अधिक झाला असावा कदाचित यामुळे चौकटीचा असलेला मुख्य वरील मुख्य दगडास  तडा गेला असावा. या दगडाची वेळीच दखल घेतली जाणे गरजेचे आहे अन्यथा कडेलोटचा पुन्हा एकदा अचानक कडेलोट होऊन जमिनदोस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे कडेलोटला असलेल्या दगडी प्रवेशद्वाराचे दरवाजाचे संवर्धन व्हावे अशी मागणी शिवजन्मभूमी संवर्धन समितीने पुरातत्व विभागाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

Salman Khan: "टाइगर जिंदा है और..."; घरावरील गोळीबार प्रकरणानंतर भाईजान पोहोचला लंडनला, यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

SCROLL FOR NEXT