Walchandnagar
Walchandnagar 
पुणे

सौरउर्जेच्या छत्रीची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील प्रसाद दिलीप चव्हाण या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या सौरउर्जाच्या ‘आधुनिक छत्री’ प्रकल्पाची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. 

पुण्यातील बावधन मध्ये नुकतेच इन्स्पायर अॅवाॅर्ड या उपक्रमातंर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील प्रसाद दिलीप चव्हाण या विद्यार्थ्याने  सौरउर्जावरच्या आधुनिक छत्रीचा प्रकल्प सादर केला या आधुनिक छत्रीतमध्ये छत्रीच्या वरच्या बाजूला सौरउर्जाचे पॅनल बसविण्यात आले आहे. दिवसा सौर ऊर्जेमुळे छत्रीची बॅटरी चार्जिंग होत असून या उर्जाचा उपयोग मोबाईल चार्जिंग करणे, फॅन लावणे, इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंचा वापर करुन संगीत एेकणे, तसेच रात्रीच्या वेळी या छत्रीचा बॅटरी म्हणून ही वापर करता येत आहे.

या प्रकल्पाची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. हा प्रकल्प करण्यासाठी विज्ञान शिक्षक महेमूद मुलाणी, बाळासाहेब मोरे, बापूराव कदम, संतोष कदम अंबादास कांबळे, स्वाती शिंदे, अर्चना भोसले यांनी मार्गदर्शन केले. राजस्तरीय निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन  पाटील, उदयसिंह पाटील, सचिव किरण पाटील, नितीन माने, प्राचार्य गणेश घोरपडे यांनी अभिनंदन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT