Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir Sakal
पुणे

Barish Date : अयोध्येत भाविकांसाठी फलक उभारणार मराठमोळा युवक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - श्रीराम मंदिरामुळे जगाच्या नकाशावर आलेल्या अयोध्येत भाविकांना मार्गदर्शन करणारे दिशादर्शक आणि माहितीपर डिझाईन फलक उभारण्याची जबाबदारी पुण्यातील एका कंपनीला मिळाली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३५० फलक उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

उत्तरप्रदेश सरकारच्या अयोध्या विकास प्राधिकरणाने मार्गदर्शक फलक डिझाईनसाठी दोन वर्षांपूर्वी स्पर्धा घेतली. त्यात जगभरातील ४०० हून अधिक डिझायनर्स सहभागी झाले होते. त्यातून बारीश दाते यांच्या ‘ग्राफिक्स बियाँड’ कंपनीला प्रथम क्रमांक मिळाला. दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिकही त्यांना मिळाले.

त्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि टाटा कन्सलटिंग इंजिनिअर्स यांनी श्रीराम मंदिर परिसरातील दिशादर्शक फलक डिझाईन करण्याची जबाबदारी दाते यांच्याकडे सोपविली. या प्रकल्पाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली. या प्रसंगी सेतू ॲडव्हर्टायझिंगचे संस्थापक ऋग्वेद देशपांडे व सी- सॅट कंपनीचे संचालक निलेश सुळे उपस्थित होते.

दाते म्हणाले, ‘मंदिर परिसरात येणारे भाविक विविध प्रांतातून येणार असल्यामुळे नागरिक हे फलक हे सर्वांना समजतील अशा भाषेत आणि चिन्हांमध्ये आहेत. विविध भाषांचा मिलाफ करून देवनागरी लिपीद्वारे हे फलक तयार होत असून त्यात इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषा वापरल्या आहेत. हे फलक ६ फुट रुंद व १५ फूट उंच अशा आकाराचे असतील.

मंदिर परिसरात सुमारे विविध प्रकारचे सुमारे ३५० फलक असतील. फलकांवर चित्रांचा वापर असेल. त्यामुळे भाषा समजली नाही तरी, तरी चित्रांच्या माध्यमातून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना अडचण होणार नाही.’ येत्या दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Lawrence Bishnoi News: बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे वैतागला सलमान खान; पोलिसांना सांगितलं सर्व काही

पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, चीन घेण्यास तयार; ड्रॅगनला गाढवं का हवी आहेत?

T20 World Cup 2024 : भारतीय संघ विजयासह अव्वल आठ संघांत;सौरभ नेत्रावळकरकडून विराट, रोहितच्या विकेट

Manoj Jarange : बीडचे खासदार सोनवणे मराठा आरक्षणासाठी सर्व खासदारांना एकत्रित करणार; मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट

Maharashtra Weather Update : पुण्यासह राज्यातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 12 तास हायअलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT