Suicide
Suicide  sakal media
पुणे

विवाहीत महिलेची इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विवाहीत महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. हि घटना वडगाव बुद्रुक येथे शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

राधिका पवन ससाणे (वय 26 , रा. माधुरी मिलींद कॉम्प्लेक्‍स, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. राधिका त्यांच्या पतीसमवेत वडगाव बुद्रुक येथील मिलींद कॉम्प्लेक्‍स या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहतात. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी चौथ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. त्या इमारतीच्या तळमजल्यावर पडल्या. त्यावेळी मोठा आवाज झाल्याने रहिवाशांनी तेथे जाऊन पाहीले, तेव्हा राधिका या गंभीर जखमी अवस्थेत पडल्या होत्या. नागरीकांनी याबाबत सिंहगड रोड पोलिसांना खबर दिली. काही वेळातच पोलिस उपनिरीक्षक डी.बी.खेडकर व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राधिका यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान, राधिका ससाणे यांनी आत्महत्या का केली, त्यामागील कारण समजू शकले नाहीत. या प्रकरणाचा तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT