पुणे

गुरूवाणी १५

CD

‘संवर’करायला शिका...

भगवान महावीरांनी अहिंसेची व्यापक अर्थाची शिकवण दिली. मच्छर मारण्यासाठी आपण विषारी साधने वापरतो. त्याने मच्छर मरतात म्हणजे हिंसा होते आणि तुमच्या शरीरातही विष जाते. मच्छरांपासून वाचण्यासाठी मच्छरदाणी वापरणे योग्य ठरते. याच पद्धतीने आपल्या पाचही इंद्रियांवर मच्छरदाणी लावली पाहिजे. मन अथवा इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची क्रिया म्हणजे ‘संवर’ असते. महाभारतात श्रीकृष्णाला विचारण्यात आले, तुम्ही द्रौपदीचे रक्षण केले पण धर्मराजला द्युतात सर्वस्व हरण्यापासून का नाही वाचवले? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दुर्योधनाला माहिती होते की, द्युतात आपण जिंकणार नाही.‌ म्हणून त्याने शकुनीला आपल्यातर्फे खेळायला लावले. हे ओळखण्यात धर्मराज कमी पडला म्हणून द्युतात हरला. धर्मराजने आधी संरक्षणाची व्यवस्था केली नाही, वनवासात जावे लागले. धोका ओळखून संरक्षक कवच निर्माण करणे यालाच संवर म्हणतात. अनेक रोगांवर वापरण्यात येणारे व्हॅक्सिन, प्रती जैविक हे सुद्धा संवर आहे. तीर्थंकर महावीर सांगतात, ज्ञानी शिष्य व्हायचे असेल, तर चांगल्या लोकांची संगत महत्त्वाची असते.‌ समर्थ रामदासांनी ‘मनाचे श्‍लोक’ रचून संवरचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जीभ आणि मनाला बिघडवणारे कान असतात. त्यामुळे कानाने वाईट ऐकूच नका. कानाला संवर द्या. वाईट गोष्टी ऐकल्याच नाहीत, तर वाईट विचारही मनात येणार नाहीत. निंदा करणाऱ्यापेक्षा निंदा ऐकणारा जास्त दोषी असतो. ऐकणाराच नसेल, तर निंदा करणारा शांत होतो. निंदकाला संजीवनी आपणच देतो. सर्वांचे मानसिक त्रास संवर नसल्यामुळे आहेत. जो माल बाजारात विकला जात नाही, तो माल तयार केला जात नाही. वाईट गोष्टींना थाराच दिला नाही, तर त्यांना किंमतच राहणार नाहीत. कचरा येण्यापासून रोखलाच नाही, तर कितीही साफसफाई करून उपयोग नाही. गुरुदेवांनी समाजाला संवर दिला. हीच व्यवस्था गुरुदेवांच्या राजधानीत अहिल्यानगरमध्ये सर्वांना करायची आहे. गुरुदेवांच्या कृपेमुळे निर्माण झालेले अद्‍भूत वातावरण बिघडले नाही पाहिजे. यासाठी फक्त संवर करायचे आहे. गुरुदेवांनी निर्माण केलेल्या गोड स्वादिष्ट खिरीत मीठ पडू द्यायचे नाही. गुरुदेवांनी आयुष्यभर ‘शुभ’चा आश्रव केला, ‘अशुभ’येऊच दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

Marathi News Live Updates : नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन घेणाऱ्या 11 शिक्षकांवर गुन्हा दाखल

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधेची शक्यता; २७ मुले, ५ मुलीं उपजिल्हा रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT