पुणे

मसूर येथील श्री भैरवनाथांची आजपासून यात्रा

CD

काळभैरव, बाल भैरवनाथांच्या
यात्रेस मसूरला आजपासून प्रारंभ

मसूर, ता. ३१ : येथील सद्‌गुरू रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मसूरचे ग्रामदैवत श्री काळभैरव व बाल भैरवनाथांची यात्रा उद्या (रविवारी) व सोमवारी (ता. दोन) होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या (रविवारी) सायंकाळी सहा वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘श्रीं’चा छबिना निघणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापकांकडून दर्शनबारीची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी अभिषेक व महापूजा होणार आहे.
यात्रेतील इतर कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे बदल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. ११) दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे मैदान होणार आहे. या मैदानात दीड लाखापर्यंतच्या इनामी कुस्त्या होतील. रात्री नऊ वाजता लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

----------------------------

02475
मसूर : येथील ग्रामदैवत श्री कालभैरव व बाल भैरवनाथांच्या मूर्ती.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT