पुणे

अक्कलकोटमध्ये मावा होणार हद्दपार, दोन नगरसेवकांनी घेतला पुढाकार,मावा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर होणार गुन्हे दाखल

CD

मावा बनवतानाचा संग्रहित फोटो घ्यावा.
---
अक्कलकोटमध्ये मावा विक्रीवर कारवाईचा इशारा
शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेची मोहीम; दोन नगरसेवकांनी घेतला पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. २८ : शहरातील स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूजन्य मावा विक्रीविरोधात अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आरोग्य समितीचे सभापती अविनाश मडिखांबे व नगरसेवक भीमराव शेळके यांच्या पुढाकारातून शहरातील मावा विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली असून, विक्री सुरू ठेवल्यास संबंधित दुकानदार व पानटपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील रस्ते मावा खाऊन थुंकल्यामुळे लालभडक व अस्वच्छ होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मडिखांबे व शेळके यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली. या मागणीची दखल घेत मुख्याधिकारी डाके यांनी शहरातील मावा विक्री करणाऱ्या टपऱ्या व दुकाने बंद करण्याचे निर्देश देत, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
अक्कलकोटमध्ये अनेक ठिकाणी मावा विक्री होत असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे अस्वच्छता व आरोग्याचे धोके निर्माण होत आहेत. तरुणांमध्ये वाढते व्यसन लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
आरोग्य समिती सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मडिखांबे यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य दिले असून, या निर्णयाचे नगराध्यक्ष मीलन कल्याणशेट्टी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलिस निरीक्षक दीपक भिताडे तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे.
---
कोट
AKK26B05917
मावा खाण्याने शरीरावर घातक परिणाम होत असून, या माव्यामुळे तरुण वर्गात मोठे व्यसन जडले आहे. मावा खाऊन कुठेही रस्त्यावर थुंकून रस्ते अस्वच्छ केले जात आहेत. त्यामुळे मावा विक्री बंद होणे गरजेचे झाले आहे.
- भीमराव शेळके, नगरसेवक, अक्कलकोट
---
कोट
AKK26B05918
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा मिळत असून, नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मकदृष्ट्या विचार केल्याचे समाधान नागरिक व्यक्त करत आहेत. रस्त्यावर दररोजच घाण निर्माण होत असून, अशी घाण बंद होणे गरजेचे आहे.
- अविनाश मडिखांबे, आरोग्य समिती सभापती, अक्कलकोट नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT