MLS26B02544
मेडद ःयेथील यात्रेत रथाच्या मिरवणुकीत भाविकांची झालेली गर्दी.
मेडदच्या कालभैरवाच्या यात्रेत भाविकांची गर्दी
माळशिरस, ता. १ ः नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या मेडद (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत कालभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात झाली. येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा माघ पौर्णिमेला साजरी केली जाते.
सोनारीच्या कालभैरवनाथाचे स्थान म्हणून व नवसाला पावणारा नाथ म्हणून या भैरवनाथावर भाविकांची मोठी श्रद्धा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून डवरी समाज मोठ्या संख्येने येतो. आज सकाळी पहाटे महाआरती झाल्यानंतर श्रींची रथातून मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. भैरवनाथाच चांगभल, देवाच्या घोड्याचं चांगभल, या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
या ग्रामदेवतास बोललेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. घरोघरी आपल्या दारात १० रुपयांपासून ५०० रुपयांच्या नोटांचे हार घेऊन थांबले होते. दरवर्षी १० रु.च्या नोटापासून पाचशे रुपयांच्या नोटांचे हार रथावर भाविक बांधतात. प्रत्येक वर्षी रथावरील नोटांच्या हाराच्या माध्यमातून व मंदिरात रोख देणगीमधून लाखो रुपये देवस्थानला जमा होतात. दोन दिवस यात्रेत आलेल्या खेळण्यामध्ये बसण्यासाठी मुलांनी मोठी गर्दी केली होती.
आज सकाळपासूनच सुरू झालेला रथोत्सव ग्रामप्रदक्षिणा घालून सुमारे अडीच वाजता मंदिरात परत आला. दुपारी कुस्त्याच्या मैदानानंतर या यात्रेची सांगता होते. यात्रा काळात कसलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माळशिरसचे पोलिस निरीक्षक विकास दिंडूरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.