पुणे

खडकवासला कालवा समितीची बैठक आठ दिवसात घेणार

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला  : "शहराला पिण्यासाठी व दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणार आहे.  याबाबत, येत्या आठ दिवसात कालवा समितीची बैठक घेऊन निर्णय घेऊ." अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. 

खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाण्याचे नियोजन च्या संदर्भात 'सकाळ'शी बोलताना ही माहिती दिली. नऱ्हे येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यासाठी पालकमंत्री यांच्या हस्ते झाले.  यावेळी, आमदार भीमराव तापकीर, सरपंच मीनाक्षी वनशिव, जिल्हा परिषद सदस्य जयश्री भूमकर,  पंचायत समिती सदस्य ललिता कुटे, उपसरपंच चैत्राली कुटे, अनिरुद्ध यादव, अरुण राजवाडे, सागर भूमकर उपस्थित होते.
मागील चार वर्षात शहराला पिण्यासाठी व जिल्ह्यात शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवून दिला नाही. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून पाणी देण्यात आले होते. असे सांगून पालकमंत्री बापट म्हणाले की, "यंदा देखील शहर जिल्हातील  पाण्याचा प्रश्न शिल्लक राहणार नाही. आरक्षणाचे पाणी मात्र याबाबत सरकार व पालकमंत्री म्हणून आम्ही काळजी घेत आहोत.

दौंड, इंदापूर या भागाला मागच्या वर्षी पाणी दिले होते. त्याचप्रमाणे, यंदा देखील आरक्षणाचे तेवढे पाणी देऊ पाण्याच्या बाबतीत मागण्या वाढत आहे. आहे त्यात भागविता येणार नाही. कोणाला पाण्यापासून देखील वंचित देखील ठेवता येणार नाही. मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा चांगला आहे. यावर्षी देखील टेमघरच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दोन महिन्यात धरणातील पाणी कमी करावे लागेल. तरी देखील आम्ही याबाबत योग्य नियोजन करु."

वाया जाणारे पाणी व चोरी रोखणार
शहरालगत असलेल्या गावांची लोकसंख्या दहा पटीने वाढत आहे. परन्तु चार धरणात तेवढेच पाणी आहे. यामुळे, शेतीला व शहराला लागणाऱ्या पाण्याबरोबर वाया जाणारे पाणी, पाण्याची चोरी रोखणे, पाण्याचा पुनर्रवापर, सुएज ट्रिटमेंट प्लँट सुरू ठेवणे, जायका प्रकल्पाच्या माध्यमातून नदी सुधार योजना मुठा नदीची स्वच्छता करणे अशा प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे. असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT