पुणे

मेळघाट पिण्याच्या पाण्याचा प्रश्न २२ गावांना टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा होतो का

CD

बावीस गावांना नियमित
पाणीपुरवठा होतो का?
मेळघाट पाण्याचा प्रश्न ; दाव्याची पाहणी करण्याचे याचिकाकर्त्यांना आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कुपोषणग्रस्त मेळघाटमधील २२ गावांना टँकरद्वारे नियमितपणे पिण्याचे पाणी पुरवल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला आहे. सरकारचा हा दावा पडताळून पाहण्याचे आणि त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी याचिकाकर्त्यांना दिले. 
राज्य सरकारने सुनावणीदरम्यान, एक तक्ता सादर केला. त्यात पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या २२ गावांना नियमित पिण्याच्या पाण्याचे दोन टँकर पाठवल्याचे नमूद केले होते. या दाव्याला दुजोरा म्हणून एका ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पत्रही सरकारने न्यायालयात सादर केले. तसेच, टँकरद्वारे होणाऱ्या पुरवठ्यातून प्रति व्यक्ती दररोज सुमारे २० लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात असल्याचा दावाही केला;  मात्र धारणीसह काही गावांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा दावा याचिकाकर्त्यांचे वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी केला. इतर अनेक गावांनाही पाणी मिळत नाही. अनेक आदिवासी गावे पाण्याच्या टँकरवर अवलंबून असल्याचे स्वयंसेवी संस्थेच्या वतीने उपस्थित असलेल्या वकील पौर्णिमा उपाध्याय यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली. त्याची दखल न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT