Pune University
Pune University 
पुणे

चित्रपटाचे शुटिंग चालते पण अधिसभा नको; पुणे विद्यापीठाच्या भूमिकेला सदस्यांचा विरोध

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, तेथे कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. मात्र, २० मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीसाठी नियमांवर बोट ठेऊन ती ऑनलाइन घेण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठाने आवश्‍यक त्या परवानग्या घेऊन थेट बैठक घ्यावी, असे सांगत अधिसभा सदस्यांनी ऑनलाइन बैठकीस विरोध केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत ७० सदस्य आहेत. अधिकारी, कर्मचारी सुमारे ४० जण उपस्थित असतात, त्यामुळे अधिसभेला १०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यात नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने अधिसभेची बैठक प्रत्यक्षात न झाल्यास गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही ऑनलाइन घ्यावी लागणार आहे. 

कुलगुरू डॉ. करमळकर यांना पत्र
अधिसभेच्या बैठकीत पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील सदस्यांचा सहभाग असतो. गेल्यावर्षी कोरोनामुळे ऑनलाइन बैठक झाली होती, त्यामध्ये अनेक अडचणी आल्या, सदस्यांना त्यांचे म्हणणे मांडता आलेले नव्हते. पुन्हा याच पद्धतीने ऑनलाइन बैठक घेण्यास सदस्यांनी विरोध केला आहे. डॉ. श्यामकांत देशमुख, दादाभाऊ शिनलकर, अभिषेक बोके, शशिकांत तिकोटे, संतोष ढोरे, डॉ. नंदू पवार, डॉ. तानाजी वाघ, अमित पाटील यांनी याबाबतचे पत्र कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले आहे. 

पुणे विद्यापीठातील सभागृहात चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, तेथे कोणत्याही नियमाचे पालन केले जात नाही. पण अधिसभेसाठी नियम दाखवून ती ऑनलाइन घेतली जात आहे. ऑनलाइन बैठकीत नेटवर्क, आवाज न येणे, सदस्यांना संधी न मिळणे अशा अनेक अडचणी येतात. 
- संतोष ढोरे, सदस्य, अधिसभा

विद्यीपाठामध्ये सुरक्षित अंतर ठेऊन अधिसभेची बैठक घेणे शक्य आहे. ऑनलाइन बैठकीत अनेक अडचणी येतात, त्यावर विद्यापीठ हिताची चर्चा करता येत नाही. त्यामुळे बैठक प्रत्यक्षात घ्यावी.
- दादाभाऊ शिनलकर, सदस्य, अधिसभा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT