Memu Train sakal media
पुणे

‘मेमू’ने दौंड -लोणावळा आता थेट प्रवास

दौंडहून लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकावर लोकल बदलणे, तिकीट काढणे तसेच लोकलची वाट पाहत थांबण्याची गरज भासणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

दौंडहून लोणावळ्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकावर लोकल बदलणे, तिकीट काढणे तसेच लोकलची वाट पाहत थांबण्याची गरज भासणार नाही.

- प्रसाद कानडे

पुणे - दौंडहून लोणावळ्याला (Daund to Lonavala) जाणाऱ्या प्रवाशांना (Passenger) आता पुणे स्थानकावर लोकल (Local) बदलणे, तिकीट काढणे तसेच लोकलची वाट पाहत थांबण्याची गरज भासणार नाही. कारण येत्या काळात दौंड -लोणावळा थेट मेमू (Memu) सुरु होणार आहे. याचा पन्नास हजार प्रवाशांना थेट फायदा होईल. वेळेतही किमान अर्धा तासाची बचत होईल. तसेच तिकीट दरातदेखील पाच ते दहा रुपये कमी होण्याची शक्यता आहे.

रेल्वेने या बाबत अधिकृत निर्णय जाहीर केला नसला तरीही पुणे रेल्वे प्रशासनाने त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरु केले आहेत. पहिल्या टप्यात चार फेऱ्याचे नियोजन झाले आहे. चार मे रोजी दिल्लीत रेल्वे मंत्रालयात दौंड -लोणावळा मेमू संदर्भात बैठक होणार आहे.

गेल्या पाच वर्षापासून दौंड -लोणावळा मेमू सुरु करण्याची मागणी आता पूर्ण होत आहे. पुणे -लोणावळा मार्गावरच्या चार लोकलच्या चार फेऱ्या या दौंडपर्यंत वाढविण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी इएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ) रेकचा वापर न करता. मेमू (मेन लाईन इलेक्ट्रिकल युनिट) च्या रेकचा वापर केला जाणार आहे. पुणे विभागात सध्या मेमूची उपलब्धता नाही. त्यामुळे आयसीएफ( इंटिग्रल कोच फॅक्टरी ) येथे चार रेकची ऑर्डर देण्यात आली आहे. ते प्राप्त होताच दौंड - पुणे मेमू धावण्यास सुरवात होणार आहे.

मेमूची वैशिष्ट्ये

  • डब्यातील आसन व्यवस्था आरामदायक

  • कोचमध्ये शौचालयाची सोय

  • पुढच्या स्थानकाची माहिती मिळणार

  • एका वेळीस २४०० प्रवासी प्रवास करण्याची क्षमता

  • ताशी ११० ते १३० इतकी गती

फायदा कोणता

  • दौंड -लोणावळा प्रवास गतिमान होईल.

  • प्रवाशांना पुणे स्थानकांवर रेल्वे बदलावी लागणार नाही.

  • दुसरी लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

  • पुणे स्थानकावरचा ताण हलका होईल.

दौंड - लोणावळा मेमू सुरु करण्याचे आमच्या नियोजनात आहे. त्या दृष्टीने प्रयत्न आहेत. रेल्वे बोर्डकडून याची अधिकृत घोषणा होईल. त्यामुळे आताच यावर अधिक बोलणे योग्य नाही.

- ब्रिजेशकुमार सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यस्थापक, पुणे

गेल्या काही वर्षांपासूनची दौंड -लोणावळा मेमू सुरु करण्याची आमची मागणी आहे. ती सुरु करण्यास स्वतः रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सकारात्मक आहेत. या संदर्भात दिल्लीत बैठक देखील होणार आहे. मेमूचा प्रवास हा सकारात्मक आहे.

- राहुल कुल, आमदार

दौंड -लोणावळा मेमू सुरु झाल्याने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामगारांना व प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. आम्ही सेवेबाबत सकारात्मक आहोत.

- विकास देशपांडे, सचिव, दौंड - पुणे प्रवासी संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT