ed esakal
पुणे

Drugs Case : ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनियाची प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात; हवाला व्यवहाराचा ‘ईडी’ कडून तपास

शहरात मेफेड्रोनचा साठा आढळून आल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मेफेड्रोनचे उत्पादन करणाऱ्या कुरकुंभ येथील कारखान्यासह दिल्ली आणि सांगलीत छापे टाकण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमली पदार्थ मेफेड्रोनच्या तस्करीमधील कोट्यवधींची रक्कम हवालामार्फत वळविण्यात आल्याचा संशय आहे. याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पोलिसांना पत्र पाठवून सविस्तर माहिती मागवली आहे. दरम्यान, पोलिसांनी फरारी मुख्य आरोपी संदीप धुनियाच्या प्रेयसीला ताब्यात घेतले असून, तिच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

शहरात मेफेड्रोनचा साठा आढळून आल्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मेफेड्रोनचे उत्पादन करणाऱ्या कुरकुंभ येथील कारखान्यासह दिल्ली आणि सांगलीत छापे टाकण्यात आले. या संपूर्ण कारवाईत तीन हजार सहाशे कोटींचा मेफेड्रोनचा साठा जप्त करण्यात आला. या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संदीप धुनिया (रा. पाटणा, बिहार) अद्याप फरार आहे. धुनिया नेपाळमधील काठमांडूमार्गे कुवेतमध्ये पसार झाला आहे.

पुणे पोलिसांनी दिल्लीत जप्त केलेले मेफेड्रोन नेपाळमार्गे लंडनमध्ये पाठविण्यात येणार होते. तर आरोपी हैदर शेखने मेफेड्रोन विक्रीतून कोट्यवधी रुपये हवालामार्फत दिल्लीत पाठविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत ‘ईडी’ने पुणे पोलिसांना पत्र पाठवून ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती मागवली आहे. हवालामार्फत झालेल्या या आर्थिक व्यवहारांसह गुन्ह्याचा समांतर तपास ‘ईडी’कडून करण्यात येणार आहे.

संदीप धुनियाच्या प्रेयसीकडे चौकशी

संदीप धुनियाची प्रेयसी सोनम ऊर्फ सीमा पंडित हिला पुणे पोलिसांनी बिहार राज्यातील पूर्णियातून ताब्यात घेतले आहे. या दोघांनी पुण्यात एक सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. धुनियाने तिच्या नावाने सीमकार्ड घेतल्याचे समोर आले आहे. तसेच, तिने धुनियाला मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे.

केमिकल पुरवठादार ओझाचाही शोध सुरू

कुरकुंभमधील अर्थकेम लॅबोरेटरी प्रा. लि. कंपनीतील केमिकल तज्ज्ञ युवराज भुजबळला ओझा नावाची एक व्यक्ती मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारे केमिकल्स पुरवठा करीत होती. या ओझाने मेफेड्रोन तयार करणाऱ्या इतर कारखान्यांनाही केमिकल्स पुरवठा केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने गुन्हे शाखेकडून ओझाचा शोध घेण्यात येत आहे.

या ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणाबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेण्यात येत आहे. पोलिसांनी संदीप धुनियाच्या प्रेयसीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज प्रकरणात तिचा सहभाग तपासण्यात येत आहे.

- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT