पुणे

प्रत्येक ‘देवदूत’ला ‘मर्सिडीज बेंझ’चेच इंजिन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या ‘देवदूत’ योजनेतील गैरव्यवहार अंगलाट येत असतानाच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांचा खुलासा खोटा असल्याचे बुधवारी (ता. १०) पुन्हा दिसून आले. ‘देवदूत’ची वाहने ज्या कंपनीची आहेत, त्या कंपनीच्या सर्वच वाहनांना निर्मितीपासूनच ‘मर्सिडिज बेंझ’चे इंजिन आहे. महापालिकेने जेव्हा सहा वाहने खरेदी केली तेव्हा या इंजिनासह एका वाहनाची किंमत केवळ ११ लाख ४७ रुपये इतकीच होती. त्यामुळे ‘मर्सिडिज बेंझ’ इंजिन असल्याने एका वाहनाला एक कोटी ८४ लाख रुपये मोजल्याचा सोनुने यांचा खुलासा फसवा आहे. 

या योजनेतील वाहन खरेदीसह तिच्या अंमलबजावणीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे ‘सकाळ’ने उघडकीस आणले आहे. एवढे पैसे देऊनही ठेकेदाराने नेमकी कोणती आणि काय कामे केली?  याची नोंद महापालिकेकडे नाही. तरीही गेल्या दीड वर्षात ठेकेदारासाठी २५ कोटी रुपये खर्च झाल्याचे प्रकरण उघड होताच, महापालिका आयुक्त सौरभ राव, सोनुने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुनील गायकवाड यांनी खुलासे केले. त्यात, देवदूतच्या वाहनांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तिला ‘मर्सिडिज बेंझ’चे इंजिन असल्याचे सोनुने यांनी स्पष्ट केले. परंतु, तशी वस्तुस्थिती नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळले. त्यामुळे या इंजिनासाठी म्हणून महापालिकेने कोणतीही अधिक किंमत वाहन कंपनीला मोजली नसल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान, या योजनेसाठी जेव्हा वाहने खरेदी करायची होती, तेव्हा तीही ‘देवदूत’ची योजना राबविणाऱ्याच ठेकेदाराने पुरविली. त्यातही ठेकेदाराने त्याला वाटेल तेवढी रक्कम घेऊन महापालिकेला वाहने दिली. जी वाहने ठेकेदाराच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे मूळ वाहन खरेदीतच तब्बल साडेदहा कोटींचा गैरव्यवहार असल्याचे आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर आणि योगेश सासणे यांनी आंदोलन करीत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. 

चौकशी अहवाल तीन दिवसांत अपेक्षित
‘देवदूत’ योजनेच्या निविदा आणि अंमलबजावणीच्या चौकशीसाठी महापालिकेतील उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तिचा अहवाल येत्या तीन दिवसांत येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. राव यांच्या दाव्यानुसार मुठे समितीचा अहवाल गुरुवारी येणे अपेक्षित आहे. मात्र, या समितीची चौकशी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, हे समितीतील अधिकाऱ्यांना सांगता आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT