pune rain 
पुणे

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस पावसाचा जोर ओसरण्याची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी वर्तविली. शहरात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ५९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  १ जून ते ३० ऑगस्टपर्यंत शहरात ५९४.२ मिलिमीटर पाऊस पडला. यंदा सरासरीपेक्षा १५८.४ मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे, असे हवामान खात्याने सांगितले.

मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भाग ते राजस्थानच्या पूर्व भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राची तीव्रता कमी होऊ लागली आहे. तसेच राजस्थानच्या परिसरात काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. याशिवाय मॉन्सूनचा आस जैसलमेर व मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भाग व पूर्व राजस्थान, चुर्क, पटना, गोलपारा ते नागालॅंडपर्यत सक्रिय आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दक्षिण उत्तर तमिळनाडू ते कोमोरिन परिसर व रायलसिमाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यात अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हलक्‍या सरींची शक्‍यता
राज्यात पुढील काही दिवस हलक्‍या सरी पडतील, तर अनेक ठिकाणी पावसाची ढगाळ वातावरणासह उघडीप, तर कोकणात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ढगाळ हवामानासह काही प्रमाणात ऊन पडेल. पुणे परिसरात व घाटमाथ्यावर हलक्‍या पावसाचा शिडकाव होईल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस 
पुण्यात पावसाळ्यातील तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ४० जास्त पाऊस पडला. जूनमध्ये पावसाने सरासरी ओलांडली होती; पण जुलैमध्ये मोठा "ब्रेक' घेतला होता; मात्र ऑगस्टमध्ये दमदार सरी पडल्या. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात यंदा ९५७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT