rain 
पुणे

पुण्यात पावसाच्या हलक्‍या सरी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांनो, या संपूर्ण आठवड्यात शहर आणि परिसरात हलक्‍या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील. आठवड्याच्या शेवटी घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तविला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. पुण्यात रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासांत फक्त एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पण पुणेकरांनो, या आठवड्याच्या (ता. 24 ते 29) सुरुवातीच्या तीन दिवसांत हलक्‍या ते मध्यम सरी पडणार असल्या तरीही त्यानंतर घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत 1 जून ते 23 ऑगस्टदरम्यान 576.2 मिलिमीटर पाऊस पडला. लोहगावमध्ये 611, तर पाषाणमध्ये 528 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

कोकणात पावसाचा जोर ओसरला 
पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने कोकणात पावसाचा जोर ओसरला आहे; मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव होत आहे. कोकणात पावसाने उघडीप दिली असून, अधून-मधून हलक्‍या सरी पडत आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नदीनाल्यांची पाणीपातळी घटली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT