as per Meteorological forecast Maximum temperature to rise over next week in pune 
पुणे

पुणेकर अनुभवणार उन्हाचे चटके कारण..

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहर व परिसरातील कमाल तापमानात पुढील आठवडाभर वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे पुणेकरांना आता उन्हाचे चटके अनुभवावे लागणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गेल्या दोन दिवसांपासून शहरात उकाडा जाणवू लागला आहे. तर शहरातील यंदाच्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद 39.7 अंश सेल्सिअस इतकी (ता. 5) झाली होती. मात्र त्यानंतर तापमानात सातत्याने घट झाल्याचे दिसून आले. परंतु पुढील काही दिवस शहर व परिसरातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होणार असून ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. याचबरोबर किमान तापमानाचा पारा 23 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून शहरात उकाडा जाणवणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ►  क्लिक करा 
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत पण वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरची गर्दी कमी झाली असून नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सद्यस्थिती पाहता घरी थांबूनच पुणेकर या उन्हाच्या झळा त्याचबरोबर कोविड 19 पासून स्वतःचा बचाव करण्यास यशस्वी होऊ शकतील.

Lockdown : शेतमाल घरपोच देण्यासाठी वाहनमालकांसाठी किसान हेल्पलाईन 

मंगळवारी शहर व परिसरातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दरम्यान राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे 43.8 अंश सेल्सिअस इतकी झाली.

Lockdown: व्हर्चुअल क्लासला वाढतेय विद्यार्थ्यांची उपस्थिती
दरम्यान मंगळवारी (ता. 13) राज्यातील तुरळक भागांमध्ये पावसाने हाजेरी लावली होती. तर काही ठिकाणी गारपीट पडले होते. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे तर मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


मंगळवारी शहर व परिसरातील कमाल आणि किमान तापमान 

ठिकाण : कमाल तापमान : किमान तापमान
शिवजीनगर : 39.7 : 22
लोहगाव : 39.7 : 23.8
पाषाण : 39.8 : 22.6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

मुलगी झाली हो...! कियारा आणि सिद्धार्थ झाले आई-बाबा, मल्होत्रा कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन!

heart-stopping footage : Video काळजाचा थरकाप उडवणारा! 'तो' ट्रॅकवर निपचित राहिला पडून अन् वरून धावती रेल्वे

आता ट्रेनच्या जनरल कोचमध्ये फक्त १५० प्रवाशांना तिकिटे मिळणार! रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

SCROLL FOR NEXT