pune metropols 
पुणे

पुणे : ‘महानगर नियोजन’ची निवडणूक नोव्हेंबरमध्ये?

सप्टेंबरच्या अखेरीस कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सप्टेंबरमध्ये जाहीर होणार असून, प्रत्यक्ष मतदान नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पीएमआरडीएच्या हद्दीतील ग्रामीण भाग (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) गटातून एकूण ९८० मतदार आहेत. या मतदार यादीबाबत काही हरकती प्राप्त झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा क्षेत्रातून २२ सदस्य निवडून द्यायचे आहे. ग्रामीण क्षेत्रातून ७ आणि नगरपरिषद क्षेत्रातून एक सदस्य निवडून द्यायचे आहेत.

मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. त्यानुसार प्राथमिक माहितीनुसार सप्टेंबर अखेरीस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. तर ऑक्‍टोबरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होऊ शकते. तर मतदान नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार

‘‘पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता. २४) विभागीय आयुक्त कार्यालयात आणि www.divcommpune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त पुणे व पिंपरी चिंचवड कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तसेच मुख्याधिकारी लोणावळा, तळेगाव, शिरूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, सासवड नगर परिषद या सर्व कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT