पुणे

माढा तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील पन्नास टक्के पदे रिक्त; सेवा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल

CD

पशुवैद्यकीय सेवेचा संग्रहित फोटो वापरावा.
---
रिक्त पदांमुळे माढ्यातील पशुवैद्यकीय सेवा कोलमडल्या
११८ गावांसाठी केवळ १९ दवाखाने; लसीकरण, कृत्रिम रेतन, उपचार सेवांमध्ये अडथळे
धैर्यशील भांगे : सकाळ वृत्तसेवा
वडशिंगे, ता. २५ : माढा तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात मंजूर ६१ पदांपैकी तब्बल ३२ पदे रिक्त असल्याने पशुधन सेवांवर मोठा परिणाम होत आहे. परिणामी जनावरांच्या उपचारांसाठी शेतकऱ्यांना खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडे जादा खर्च करून उपचार करून घ्यावे लागत आहेत.
माढा तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीसोबत दुग्धव्यवसाय हा जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीसाठी सेंद्रिय खत आणि घरखर्चासाठी दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्य सेवांसाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तालुक्यातील ११८ गावांसाठी केवळ १९ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. शासनाकडून जनावरांवर बांधावर जाऊन उपचार करण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध असली, तरी त्यामध्ये कार्यरत राहणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या सेवेचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही.
सध्या माढा तालुक्यात सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर अशा विविध संवर्गांतील एकूण ३२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा, लसीकरण, कृत्रिम रेतन आणि गंभीर आजारांवरील उपचार यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
कुर्डुवाडी येथे पशुधन विकास अधिकारी (गट-ब), माढा व म्हैसगाव येथे सहायक पशुधन विकास अधिकारी, तर बारलोणी, कुर्डुवाडी, पिंपळनेर, टेंभुर्णी, बेंबळे, उपळाई, आढेगाव, मोडनिंब आणि लऊळ येथे पशुधन पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. याशिवाय १९ पशू चिकित्सालयांपैकी १२ ठिकाणी परिचर नसल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे शासकीय यंत्रणा वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकत नसल्याने जनावरांच्या उपचारांसाठी खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
---
कोट
माढा पशू चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रात नऊ गावे येतात. येथे एकच डॉक्टर कार्यरत असून एकही परिचर उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपचार करायचे असल्यास दवाखाना बंद करून जावे लागते. नऊ गावांना सेवा देताना वेळेवर सर्वत्र पोचणे कठीण होते.
- डॉ. अनंत सोनवणे, पशुधन पर्यवेक्षक, माढा
---
कोट
माढा तालुक्यात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, पशुसंवर्धन विभागातील विविध संवर्गांतील जवळपास ५० टक्के पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा देण्यास विलंब होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. विवेकानंद शिंदे, पशुधन विस्तार अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

फक्त ६ एपिसोड पण सगळीकडे फक्त याच सीरिजची चर्चा! नेटफ्लिक्सवर येताच ठरली नं. १ ; तुम्ही पाहिलीत का?

Sunil Tatkare यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : रस्ता खड्ड्यात; टोलवसुली मात्र जोरात! घोटी-पडघा टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप

Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

SCROLL FOR NEXT