पुणे

म्हाळुंगे-हिंजवडी रस्ता लवकरच लागणार मार्गी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भूसंपादनाअभावी रखडलेला म्हाळुंगे गावठाणातून हिंजवडी फेज एक आणि तीनला जोडणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तेथील शेतकऱ्यांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) जागा देण्याची तयारी दर्शविल्याने रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. 

पर्यायी रस्ता नसल्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होते. विशेषत: पिंपरी-चिंचवडकडून भुजबळ चौकात आल्यानंतर हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिवाजी चौकापर्यंत नेहमी वाहतूक कोंडी होते. मध्यंतरी पीएमआरडीएने मर्चिडीस बेंझ कंपनीच्या शोरूमपासून पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी काही रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचच भाग असलेल्या म्हाळुंगे गावठाणमधून एक रस्ता हिंजवडी येथे जातो. 

कोंडी फुटण्यास होणार मदत
या रस्त्याचे सुमारे तीन किलोमीटरहून अधिक काम झाले आहे. मात्र, सातशे मीटर रस्त्याचे काम जागा ताब्यात मिळत नसल्यामुळे थांबले होते. आता थांबलेले काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने भुजबळ चौक ते शिवाजी चौकदरम्यान होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT