पुणे

मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशाकडून मोठी वसुली

CD

मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले २२७ कोटी

३८ लाख प्रकरणांमधून २२७ कोटी; सोलापूर विभागात दहा कोटींची दंड वसुली

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : मध्य रेल्वेने २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते फेब्रुवारी-२०२६) या आर्थिक वर्षात अनधिकृत आणि विनातिकीट प्रवाशांकडून २२७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोलापूर विभागाने २.३० लाख प्रकरणातून १०.५३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते फेब्रुवारी-२०२६) मध्ये विनातिकीट किंवा अवैध प्रवास करणाऱ्या ३७.९९ लाख प्रवाशांना पकडले, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ३४.६० लाख प्रवाशांना पकडले. यावर्षी हे प्रमाण जवळपास १० टक्क्यांनी वाढले आहे.
आर्थिक वर्ष २०२५–२६ (एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६) या कालावधीत रुपये २२७.०३ कोटी इतकी विक्रमी दंड वसुली करण्यात आली. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत १८५.६२ कोटी रुपये दंड रक्कम वसूल करण्यात आली होती. या दंडाच्या रकमेत २२ टक्के पेक्षा अधिक वाढ झाली आहे.
फेब्रुवारी २०२६ महिन्यात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट, अयोग्य किंवा अवैध प्रवास करणारे ३.६५ लाख प्रवाशांना पकडले. त्याच्या तुलनेत फेब्रुवारी २०२५ मध्ये ३.३२ लाख प्रवासी पकडले गेले होते, म्हणजेच यावर्षी सुमारे १० टक्के वाढ यामध्ये नोंदवली गेली आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये नियमभंग करणाऱ्या प्रवाशांकडून २३.२७ कोटी रुपये इतकी दंडरक्कम वसूल करण्यात आली, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ही रक्कम १८ कोटी रुपये होती. यामध्ये यावर्षी सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विभागनिहाय दंड वसुली
विभाग प्रकरणे (लाखात) दंड वसुली (कोटीत)
मुंबई विभाग - १६.१६ ७१.३२
भुसावळ विभाग - ८.९४ ७५.२९
पुणे विभाग - ४.३१ २७.१४
नागपूर विभाग - ४ .०० २४.९३
सोलापूर विभाग - २.३० १०.५३
मुख्यालय - २.२८ १७.८२
एकूण ३८ २२७
................
तपासणीचे प्रकार
मध्य रेल्वे अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी बहुआयामी धोरणाचा अवलंब करते. यामध्ये स्टेशन तपासणी, अँबुश तपासणी, फोर्ट्रेस तपासणी, सखोल तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम यांचा समावेश आहे. ही कारवाई सर्व विभागांतील मेल/एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या आणि विशेष गाड्या यामध्ये तसेच मुंबई व पुणे विभागातील उपनगरी गाड्यांमध्ये नियमितपणे करण्यात येते.
..................
मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन
बनावट तिकीट तयार करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फसवे मार्ग वापरू नयेत आणि अशा तिकिटांवर प्रवास करू नये. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता अंतर्गत दंड आणि कमाल ७ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT