Encroachment Crime Sakal
पुणे

Pune News : मध्यरात्री नोटीस; अन् सकाळी महापालिकेने केले घर उध्वस्त

शेजारच्या दोन कुटुंबांमध्ये २०१६ पासून वाद सुरु आहे, त्यापैकी एकाने अनधिकृत बांधकाम केल्याने महापालिकेत तक्रारी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात अनधिकृत इमले, अतिक्रमणे होत असताना वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतरही कारवाई टाळली जाते. मात्र, येरवडा येथे झोपडपट्टीत मध्यरात्री साडेबारा वाजता पोलिसांनी नोटीस बजावली, त्यानंतर सकाळी लगेच महापालिकेच्या पथकाने संपूर्ण घर उध्वस्त करून टाकले. घरातील सामानसुद्धा बाहेर काढण्याचा वेळ दिला गेला नसल्याने इतरवेळी कारवाई टाळणाऱ्या महापालिकेला इतकी घाई का? प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

येरवडा येथील गणेश नगरमध्ये पारसदास रांका यांचे घर आहे. त्यांच्या शेजारच्या दोन कुटुंबांमध्ये २०१६ पासून वाद सुरु आहे, त्यापैकी एकाने अनधिकृत बांधकाम केल्याने महापालिकेत तक्रारी केली होती. त्यानंतर या तक्रारदाराने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. त्यामध्ये झालेल्या सुनावणीत आयोगाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने येथील चार घरांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये रांका यांच्या घराचाही समावेश होता.

मंगळवारी (ता. ९) मध्यरात्री येरवडा पोलिसांनी रांका यांना कारवाई केली जाणार असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने कारवाई सुरु केली. रांका यांच्या दोन खोल्यांचे छत पूर्णपणे पाडून टाकले, त्यामध्ये घरातील सामानाचे नुकसान झाले. पण ज्यांच्यात भांडणे होते, त्यांच्यावर किरकोळ कारवाई केल्याने महापालिकेच्या हेतूवरच प्रश्‍न उपस्थित केला आहे.

पासरदास रांका म्हणाले, ‘गेल्या १५ वर्षापासून या ठिकाणी मी राहात आहे, या भागात अनेक अनधिकृत घरे आहेत. माझी कोणाबद्दलच तक्रार नव्हती. नातेवाईक वारल्याने मी राजस्थानला निघालो होतो, पण मी घरी नसताना पत्नीला रात्री साडेबाराला पोलिसांनांकडून कारवाईची नोटीस मिळाली. सकाळी लगेच महापालिकेने माझे घर महापालिकेने उध्वस्त करून टाकले. घरातील सामान देखील बाजूला काढू दिले नाही. पण इतरांवर अगदी किरकोळ कारवाई केली आहे.

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तुळशीराम नागटिळक म्हणाले, ‘गणेशनगरमध्ये २०१६ पासून शेजाऱ्यांमध्ये भांडणे सुरु होते, त्यात अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत. तक्रारदाराने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई केली. तसेच रांका यांनी जिल्हा न्यायालयात या नोटिसीविरोधात याचिका दाखल केली आहे, पण त्यावर स्थगिती नसल्याने कारवाई झाली. रांका यांच्या घरावर मुद्दाम जास्त कारवाई केलेली नाही.

शेजाऱ्यांची भांडणे पडली महागात

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अनेक घरांचे पक्के बांधकामे करण्यात आले असून, काही घरे हे दोन ते तीन मजली झाली आहेत. येथे नागरिक राहात असल्याने महापालिका कारवाई करत नाही. पण शेजाऱ्यांमधील भांडणामध्ये एकमेकांच्या तक्रारी करून कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT