migrants as 28 Shramik trains carry 35000 migrants out of Pune division
migrants as 28 Shramik trains carry 35000 migrants out of Pune division 
पुणे

पुण्यातून ३५ हजार मजूर मूळ गावी रवाना; काय आहे आजच्या रेल्वेगाड्यांचे नियोजन?

वृत्तसंस्था

पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान आणि बिहार राज्यामधील 35 हजार 163 मजुरांना घेऊन पुणे विभागातून 28 विशेष रेल्वेगाड्या रवाना करण्यात आल्या. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी  11, उत्तरप्रदेशसाठी 11, उत्तराखंड, बिहार आणि तामिळनाडूसाठी प्रत्येकी एक, राजस्थानसाठी तीन अशा एकूण 28 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवडच्या परिस्थितीचा नड्डा यांनी घेतला व्हिसीद्वारे आढावा

आजच्या रेल्वेगाड्यांचे नियोजन :
पुणे विभागातून 15 मे रोजी मध्यप्रदेशसाठी तीन रेल्वेगाड्या नियोजित असून, यामध्ये एकूण 3 हजार 600 प्रवाशी अपेक्षित आहेत. यापैकी पुणे स्थानकावरून तीन रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, उत्तरप्रदेशसाठी तीन रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, यामध्ये 4 हजार 312 प्रवाशी अपेक्षित आहेत. यापैकी पुणे रेल्वे स्थानकामधून एक आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकामधून दोन रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तर, बिहारसाठी कोल्हापूर स्थानकामधून एक रेल्वे नियोजित असून, एक हजार 456 प्रवाशांना पाठवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी  यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Ajit Pawar : कारखाने बंद पाडायचा माझा उद्योग नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

SCROLL FOR NEXT