Pune  sakal
पुणे

Pune News : दोन हजार लघुउद्योजकांचे स्थलांतर

नऱ्हे, धायरीतील स्थिती; पालिकेकडून कोणतीच सुविधा नाही

दत्ता सावंत

पुणे : महापालिका कोट्यवधींचा कर घेते. मात्र, पायाभूत सुविधाही पुरवत नाही. वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांनी डोके वर काढल्याने व्यवसायाला खीळ बसत आहे. त्यामुळे चार वर्षांत सुमारे ४० टक्के अर्थात दोन हजार लघुउद्योग येथून स्थलांतरित झाल्याची धक्कादायक माहिती नऱ्हे येथील उद्योजकांनी दिली. ही स्थिती अशीच राहिली तर आगामी काळात ही लघुउद्योगनगरी ओस पडेल, अशी भीती त्यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

नऱ्हे, धायरी या दोन्ही गावांच्या वेशीवर ही उद्योगनगरी वसलेली आहे. मात्र, पाच वर्षांपासून समस्यांचा विळखा एवढा वाढला आहे की, येथे नवीन उद्योग येणे सोडाच, जुने उद्योजक येथून स्थलांतराच्या निर्णयावर आलेले दिसत आहेत. नऱ्हे आणि धायरी ही दोन्ही गावे महापालिकेत आल्याने या भागात शहरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे.

ग्रामपंचायत बरी होती

सी टेक इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सतीश मुथा यांनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महापालिका नुसती करवसुली करत आहे. त्यांना आमच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नाही. खरंतर आमचे लघुउद्योग आहेत. त्यामुळे त्यासाठी तशी करप्रणाली असायला हवी.

सरसकट व्यावसायिक कर लावण्याला काय अर्थ आहे. तसेच गावातील रस्त्यांची स्थिती महापालिकेला दिसत नाही का? आमच्या उद्योगांसमोर एवढी अतिक्रमणे झाली आहेत की, मालाची ने-आण करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायत असताना तरी पाणी, कचऱ्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. आता मात्र कोट्यवधींचा कर भरूनही आम्हाला त्रास सहन करावा लागत असेल तर इथून स्थलांतरित होणेच चांगले.

१०० एकर उद्योगनगरीचे क्षेत्र

२५० कोटी रुपयेउद्योजकांकडून जाणारा कर

२ हजार चार वर्षांत उद्योगांचे स्थलांतर

७०० कोटी रुपये - वार्षिक उलाढाल

८० टक्के मिळकरकरात झालेली वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT