पुणे

दुधाला दरवाढीची उकळी;

CD

दुधाला दरवाढीची उकळी!

चहा, दही, मिठाईसह दुग्धजन्य पदार्थ महागणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दूध दरवाढीमुळे अजून एक फटका बसला आहे. विविध दूध उत्पादक कंपन्यांनी प्रतिलिटर तब्बल दोन रुपयांची दरवाढ जाहीर केल्याने घरगुती बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा थेट परिणाम विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींवरही होणार असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

दूध हा बहुसंख्य भारतीयांच्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे दुधाच्या किमतीतील अगदी किरकोळ वाढही थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारी ठरते. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात दररोज हजारो लिटर दुधाचा वापर चहा स्टॉल, हॉटेल्स, बेकरी आणि खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. अमूल दुधाचे सर्वच ब्रँड लिटरमागे दोन रुपयांनी वाढले आहेत. गोकुळ, वारणा, सोनाईसह सर्वच दूध ब्रँडच्या किमती वाढल्या आहेत. दह्याच्या दरात प्रतिकिलो २० रुपये, तर आइसक्रीमच्या विविध प्रकारांमध्ये प्रत्येकी सरासरी पाच रुपयांची वाढ झाली आहे. चीजचे दर प्रतिकिलो २० रुपये वाढल्याने ग्राहकांसह किरकोळ विक्रेत्यांनाही आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे कटिंग चहापासून ते बेकरी पदार्थांपर्यंत अनेक वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी दरवाढ झालेली आहे. दूध दरवाढीमुळे तूप, लोणी, मस्का, पनीर, दही, ताक, श्रीखंड, आइसक्रीम, खवा तसेच विविध मिठायांच्या किमतीवरही परिणाम होणार आहे आणि वाढीव खर्चाचा भार अखेरीस ग्राहकांच्या खांद्यावर पडणार आहे.
...
किमतीत वाढ का?
जनावरांच्या चाऱ्याच्या वाढलेल्या किमती, गुरांच्या औषधांवरील वाढता खर्च, वीज व इंधन दरवाढ, वाहतूक खर्चात वाढ, शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या वाढलेल्या किमती, दूध संकलन व शीतगृह व्यवस्थेवरील वाढता खर्च तसेच हवामान बदलामुळे दूध उत्पादनात झालेली घट या सर्व कारणांमुळे दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT