Minister of State Dattatraya Bharne Indapur city occasion Babasaheb Ambedkar Jayanti
Minister of State Dattatraya Bharne Indapur city occasion Babasaheb Ambedkar Jayanti sakal
पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २ कोटी रुपये देण्याची घोषणा : दत्तात्रय भरणे

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. शहरातील आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन वरच्या मजल्याच्या कामासाठी एक कोटी रूपये व वाचनालयासाठी ५० लाख रूपये असे एकूण दीड कोटी रूपये तर इंदापूर नगरपरिषद प्रभाग क्र.१ मधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येथे युवती व महिलांसाठी अभ्यासिका व सुसज्ज वाचनालयासाठी ५० लाख रुपयांचा निधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजूरकेल्याने शहर वैभवात वाढ होणार आहे.

येथील जेतवन बूद्धविहारात तथागत महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त मंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर शहराचे चौक सुशोभीकरण केल्याने शहर सौंदर्यात भर पडली आहे तर डॉ. आंबेडकर नगर परिसरात विकास कामांसाठी २ कोटी ७९ लाख रुपयाचा निधी मंजूर केला असून शहर विकासासाठी कटीबध्द आहे.

यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील,नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे,पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, नगराध्यक्षा अंकिता शहा, नगर सेविका राजश्री मखरे व हेमलता माळुंजकर, वकील राहुल मखरे, विठ्ठल ननवरे,धनंजय बाब्रस, श्रीधर बाब्रस, आरपीआय पुणे जिल्हा सचिव शिवाजी मखरे, संदीपान कडवळे,दादा सोनवणे,बाळासाहेब सरवदे,वसंत माळुंजकर, प्रा.बाळासाहेब मखरे, उमा इंगुले उपस्थित होते .प्रास्ताविक डॉ.आंबेडकर जयंती उत्सवसमितीचे अध्यक्ष अँड.किरण लोंढे यांनी तर उपाध्यक्ष महेश सरवदे यांनी आभार मानले.

शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सोसायटी जयंती उत्सवात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ व स्वप्निल राऊत, नगरसेविका सुवर्णा मखरे, सुरेश मखरे, सुधिर मखरे,वर्षा मखरे,शोभा कांबळे,महादेव लोखंडे, विकास खिलारे,वसिम बागवान,श्रीकांत मखरे,अश्विनी मखरे,योजना वाघमारे,अलका मखरे,हेमा मखरे उपस्थित होते.

फोटो इंदापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, किरण लोंढे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT