minor girl from Pune abducted and sold in Madhya Pradesh for Rs 50000 two arrested rak94
minor girl from Pune abducted and sold in Madhya Pradesh for Rs 50000 two arrested rak94 sakal
पुणे

Pune Crime News : लग्नाचं अमिष दाखवून पुण्यातील अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशात विकलं; दोघे अटकेत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील १४ वर्षीय मुलीचा ५० हजार रुपयांसाठी मध्य प्रदेश मध्ये सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ५० हजार रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. दरम्यान या अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून नेऊन विकणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश मध्ये जाऊन सुटका केली आहे. शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाह (४०) आणि धर्मेंद्र यादव (२२) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा - नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉपमध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख शांतीशी झाली. शांतीने या तरुणीला तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वासन देऊन तिला मध्य प्रदेशात नेले.

मध्य प्रदेशात शांतीने या तरुणीचे जबरदस्तीने अवघ्या ५० हजार रुपयांसाठी धर्मेंद्र यादव या अरोपिशी लग्न लावून दिले. दरम्यान, यादव यानने शांतीला लग्न करण्यासाठी एक मुलगी शोध आणि पैसे घे असे सांगितल्याने हा सगळा प्रकार शांतीने केला. पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT