पुणे

आपटीतील बेपत्ता विवाहितेचा भीमा नदीकाठी मृतदेह आढळला

CD

कोरेगाव भीमा, ता. ११ : गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपटी (ता. शिरूर) येथील २५ वर्षीय निकिता अविनाश गाडेकर यांचा मृतदेह रविवारी (ता. ९) सकाळी कोरेगाव भीमा येथील भीमा नदीकाठी आढळून आला. या घटनेमुळे त्यांच्या ११ महिन्यांच्या मुलीचे मातृछत्र हरपले आहे.
निकिता गाडेकर या मंगळवारी (ता. ४) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या. पती अविनाश गाडेकर यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. रविवारी (ता. ९) सकाळी साडेसातच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील फडतरे वस्ती परिसरात नदीकाठी एक मृतदेह आढळला. नातेवाइकांनी कपड्यांवरून निकिता यांची ओळख पटवली. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! पुढील २-३ तासात पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा इशारा

फक्त ६ एपिसोड पण सगळीकडे फक्त याच सीरिजची चर्चा! नेटफ्लिक्सवर येताच ठरली नं. १ ; तुम्ही पाहिलीत का?

Sunil Tatkare यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Har Ghar Tiranga 2026 : १५ ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन

SCROLL FOR NEXT